Maharashtra Politics : 'देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबाइतकेच क्रूर, दोघांचा कारभार एकसारखा..' काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका

Aurangzeb CM Devendra Fadnavis : औरंगजेब हा क्रूर शासक होता. देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याच्याइतकेच क्रूर आहेत, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
Aurangzeb Devendra Fadnavis
Aurangzeb Devendra FadnavisSaam Tv
Published On

Aurangzeb Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरुन राजकारण तापले आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्याकडून ही कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे मिलिंद एकबोटे यांनी कबर उध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. याच दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट औरंगजेबाशी तुलना केली आहे. 'औरंगजेब हा क्रूर शासक होता. देवेंद्र फडणवीस सुद्धा औरंगजेबाइतकेच क्रूर आहेत', असे विधान त्यांनी केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Aurangzeb Devendra Fadnavis
दगाफटका करून जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

'औरंगजेब हा धर्माचा आधार घ्यायचा. औरंगजेब कधी हजला गेला नाही. तो क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. फडणवीस देखील धर्माचा आधार घेत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणासारख्या घटना घडत आहेत. खासदारांच्या लेकीबाळी आज सुरक्षित नाही आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना महाराष्ट्रात वाईट प्रकार घडत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेब यांचा कारभार एकसारखा आहे' असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

मागील काही दिवसांपासून औरंगजेब आणि त्याची कबर यावरुन राज्याचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा दिला आहे. अशातच हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Aurangzeb Devendra Fadnavis
शरद पवारांनी धनंजय मुंडेंचे आधीच कान पकडले असते तर...; अंजली दमानिया बीड प्रकरणावरुन आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com