शरद पवारांनी धनंजय मुंडेंचे आधीच कान पकडले असते तर...; अंजली दमानिया बीड प्रकरणावरुन आक्रमक

Anjali Damania on Beed Crime : अंजली दमानिया माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, शरद पवार म्हणाले मागे म्हणाले होते की, धनंजय मुंडेंना आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलं, काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या.
Anjali Damania aggressive on beed crime questions to Sharad Pawar
Anjali Damania aggressive on beed crime questions to Sharad PawarSaam Tv News
Published On

मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आणि बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांवर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया चांगल्याच आक्रमक झालेल्या दिसत आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम आज बीडमध्ये आपल्याला दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर बीड प्रकरणात आक्रमक भूमिका घेतलेल्या अंजली दमानियांनी टीका केली आहे. इतकंच नाही, तर त्यांनी शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं असाही सल्ला दिला आहे.

आज देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना दमानिया यांनी शरद पवारांनी आधीच जर नेत्यांना त्यांच्या चूका दाखवल्या असत्या आणि तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं. धनंजय मुंडेंचे आधीच कान का पकडले नाही? हे संगळ थांबवलं गेलं पाहिजे, असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Anjali Damania aggressive on beed crime questions to Sharad Pawar
प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण, १४ दिवस मृत्यूशी झुंज, माऊलीचा करुण अंत; आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश

अंजली दमानिया माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, शरद पवार म्हणाले मागे म्हणाले होते की, धनंजय मुंडेंना आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलं, काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या. का तुम्ही त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या होत्या? धनंजय मुंडे यांना तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं. बीड मधील जितके आमदार आहेत, एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे त्यांच्या पक्षातले होते. शरद पवार यांनी त्यांना काय केलं, त्यांनी काय शिकवलं, असा सवाल दमानिया यांनी शरद पवारांना केला आहे.

सगळ्या पक्षांना गरज आहे की, त्यांनी सगळ्यावर कारवाई करावी आणि जो चुकीचा वागेल त्याच्यावर कठोर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडून अपेक्षित आहे. जर हे होत नसेल, हे थांबत नसेल, तर या पक्षांवर बहिष्कार टाका, अशी देखील मागणी करणे गरजेचे आहे असं म्हणत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं.

Anjali Damania aggressive on beed crime questions to Sharad Pawar
छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र, शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य; राजकारण तापण्याची शक्यता?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com