Vasai Shocking : फुटबॉल कोचकडून सलग ३ वर्ष अल्पवयीन मुलीवर बलात्कार; क्रीडा क्षेत्रात खळबळ

vasai news : फुटबॉल कोचने सलग ३ वर्ष अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
vasai crime news
vasai Saam tv
Published On
Summary

वसईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

फुटबॉल कोचकडून १७ वर्षीय तरुणीवर सलग ३ वर्ष अत्याचार

पोलिसांकडून फुटबॉल कोचला अटक

फुटबॉल खेळात नाव कमावण्यासाठी धडपड करणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील वसईत राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर फुटबॉल कोचने सलग ३ वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चांगला करिअरचे आमिष देऊन कोचने तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचे उघड झालं आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर कोचविरोधात पोस्को कायद्यासहित विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांकडून फुटबॉल कोचला अटक करण्यात आली आहे.

vasai crime news
Crime News: आठवीतील विद्यार्थिनीला बळजबरी दारू पाजली; नंतर हॉटेलमध्ये घेऊन गेले अन्... धक्कादायक कृत्यानं खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फुटबॉल कोच हा वसईत एका खासगी फुटबॉल ट्रेनिंग सेंटर चालवतो. पीडित तरुणी २०२३ साली त्याच्याजवळ फुटबॉल ट्रेनिंगसाठी आली. काही दिवसांनी फुटबॉल कोचने तरुणीला फुटबॉल क्षेत्रात चांगली संधी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीवर सलग तीन वर्ष अत्याचार केला. अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढल्याचाही आरोप आहे.

तक्रारीनुसार, नराधम कोच काही दिवसांनंतर अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दबाव टाकू लागला. तसेच कोच मुलीला मानसिक त्रास देऊ लागला. कोचच्या त्रासाला कंटाळून मुलीने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने कुटुंबीयाच्या मदतीने पोलिसांत तक्रार दिली. पीडित मुलीने वसईतील मानिकपूर पोलीस स्टेशमनमध्ये जाऊन पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून कोचविरुद्ध गुन्हा दाखल केला.

vasai crime news
Crime News: मानवतेला काळिमा! पहाटे दोघांनी गार्डनमध्ये नेलं अन्...; 61 वर्षीय मानसिकदृष्ट्या दिव्यांग महिलेसोबत पाशवी कृत्य

या प्रकरणी पोलिसांनी नराधम फुटबॉल कोचविरोधात पोस्को कायद्यासहित विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. यात पीडित मुलीला बलात्कार, धमकीचाही समावेश आहे. आरोपी कोच सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com