Shruti Vilas Kadam
भीमाशंकर अभयारण्याच्या परिसरात वसलेले भोरगिरी हे निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथील हिरवाई आणि धुक्याने नटलेले डोंगर पर्यटकांना भुरळ घालतात.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला वरंधा घाट पावसाळ्यात धबधबे, ढग आणि हिरव्यागार निसर्गाने बहरून जातो. फोटोग्राफी आणि निसर्गभ्रमंतीसाठी हे उत्तम ठिकाण मानले जाते.
मुळशी आणि रायगडला जोडणारा ताम्हिणी घाट मान्सूनमध्ये विशेष आकर्षण ठरतो. दाट जंगल, धुक्याची चादर आणि रस्त्याच्या कडेला कोसळणारे धबधबे पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.
वाहनमुक्त हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेले माथेरान पावसाळ्यात आणखी सुंदर दिसते. शांत वातावरण, निसर्गरम्य पॉइंट्स आणि थंड हवामानामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात.
तानाजीसागर धरणामुळे प्रसिद्ध असलेले पानशेत हे कुटुंबासह एकदिवसीय सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात धरण परिसर आणि हिरवाई मन मोहून टाकते.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले इगतपुरी हे महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात येथील डोंगर, धबधबे आणि धुक्याचे दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील माळशेज घाट हा पावसाळी पर्यटनाचा राजा मानला जातो. उंच कडे, असंख्य धबधबे आणि ढगांनी वेढलेला निसर्ग पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो.
आदिवासी संस्कृती, निसर्गरम्य डोंगरदऱ्या आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असलेले जव्हार हेही पावसाळ्यात भेट देण्यासारखे सुंदर हिल स्टेशन आहे.