Weight Loss: पोटावरील हट्टी चरबी कमी करायची आहे? रोज करा हे 5 सोपे व्यायाम

Shruti Vilas Kadam

प्लँक (Plank)

प्लँक हा कोअर स्नायूंना मजबूत करणारा प्रभावी व्यायाम आहे. हा व्यायाम पोट, पाठ आणि खांद्यांवर काम करतो. सुरुवातीला 20 ते 30 सेकंद प्लँक धरून ठेवण्याचा प्रयत्न करा.

Plank

क्रंचेस (Crunches)

क्रंचेस पोटाच्या स्नायूंवर थेट परिणाम करतात. नियमित क्रंचेस केल्याने पोटाचा भाग टोन होण्यास मदत होते आणि अतिरिक्त चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते.

Bicycle Crunches | Saam Tv

माउंटन क्लाइंबर्स (Mountain Climbers)

हा व्यायाम कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा उत्तम मिलाफ आहे. यामुळे कॅलरी बर्न होतात आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळू शकते.

Mountain Climbers | Pintrest

बायसिकल क्रंचेस (Bicycle Crunches)

बायसिकल क्रंचेस केल्याने पोटाच्या बाजूंचे स्नायू आणि कोअर मजबूत होतात. हा व्यायाम कंबर आणि पोटाभोवतीची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो.

Bicycle Crunches | Yandex

लेग रेजेस (Leg Raises)

लेग रेजेसमुळे खालच्या पोटावरील स्नायूंवर ताण येतो. नियमित सराव केल्यास पोटाचा खालचा भाग मजबूत होण्यास मदत होते.

Leg Raises | Google

सातत्य आणि योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा

फक्त व्यायाम करून पोटावरील चरबी कमी होत नाही. संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि नियमित झोप यांची जोड दिल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात.

Weight Loss | pinterest

हळूहळू व्यायामाची वेळ वाढवा

सुरुवातीला कमी वेळ आणि कमी पुनरावृत्ती करा. शरीराची क्षमता वाढल्यानंतर व्यायामाचा कालावधी आणि तीव्रता वाढवल्यास अधिक फायदे मिळू शकतात.

Weight Loss | pinterest

Contact Lens Safety: तुम्ही पण सारखे कॉन्टॅक्ट लेन्स वापरता? जाणून घ्या नीट काळजी नाही घेतली तर काय होईल?

Contact Lens Safety | Pintrest
येथे क्लिक करा