Shruti Vilas Kadam
लेन्स हाताळण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. लेन्स सोल्यूशन नियमित बदला. लेन्स केस स्वच्छ ठेवा. मुदत संपलेल्या लेन्स वापरू नका. डोळ्यांत त्रास जाणवल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
अस्वच्छ हातांनी लेन्स लावल्यास किंवा काढल्यास जीवाणू आणि बुरशी डोळ्यांमध्ये जाऊ शकतात. यामुळे डोळ्यांचे गंभीर संक्रमण होण्याची शक्यता वाढते.
दीर्घकाळ लेन्स वापरणे किंवा स्वच्छता न राखणे यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, खाज आणि लालसरपणा निर्माण होऊ शकतो.
लेन्समुळे डोळ्यांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यास कॉर्निया प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे दृष्टीवरही परिणाम होण्याचा धोका असतो.
काही लोकांना लेन्स वापरताना डोळे कोरडे पडण्याची समस्या जाणवते. योग्य काळजी न घेतल्यास ही समस्या अधिक वाढू शकते.
घाणेरड्या किंवा खराब झालेल्या लेन्स वापरल्यास दृष्टी धूसर दिसू शकते. अशा वेळी लेन्स त्वरित बदलणे आवश्यक असते.
बहुतेक कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपणे टाळावे. यामुळे डोळ्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन संसर्गाचा धोका वाढतो.