DA HIKE Saam Tv
देश विदेश

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; डीएमध्ये केली ३ टक्क्यांनी वाढ, आता पगार किती मिळणार?

DA Hike update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळालं आहे. डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : दिवाळीआधीच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने महगाई भत्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर डीए आता ५३ टक्के केला आहे. मागील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात ४ टक्यांनी वाढ झाली होती.

५३ टक्के झाला कर्मचाऱ्यांचा भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या ५० टक्के महागाई भत्ता मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३ टक्के महागाई भत्ता दिल्याचं बोललं जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२४ पासून महागाई भत्ता मिळणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. यामुळे त्यांच्या पगारात वाढ पाहायला मिळणार आहे.

केंद्र सरकर जानेवारी ते जुलै महिन्यात महागाई भत्त्याबाबत निर्णय घेते. याआधी २४ मार्च २०२४ रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४ टक्के महागाई भत्ता जाहीर केला होता. त्यावेळी त्यांना मिळणारा महागाई भत्ता ४६ टक्क्यांहून ५० टक्के केला होता. त्यानंतर आता महागाई भत्ता ५३ टक्के होणार आहे.

कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ३ टक्के केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. उदाहरण म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला ५५,२०० रुपये पगार मिळत असेल. त्यात ५० टक्क्यानुसार महागाई भत्ता हा २७,६०० रुपये मिळत आहे. जर महागाई भत्ता ५३ टक्के झाल्यानंतर २९,२५६ रुपये मिळेल. यानुसार, त्या कर्मचाऱ्याच्या पगारात १,६५६ रुपये वाढ मिळेल.

तीन महिन्यांची मिळेल थकबाकी

मोदी सरकारने महागाई भत्यात वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकी मिळेल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकी मिळेल. एकूण चार महिन्याच्या थकबाकी एकत्र मिळेल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीत पगारात वाढ पाहायला मिळेल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाशी संबंधित असतो. हा निर्देशांक मागील १२ महिन्यांच्या किरकोळ महागाईची नोंद केली जाते. जगातील वाढती महागाई आणि वाढत्या गरजा या देशाच्या अर्थसंकल्पासाठी महत्वपूर्ण असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अजित पवारांच्या निवडणूक खर्चाबाबत सचिन सावंत यांचा मोठा आरोप

हृदयद्रावक! थाटामाटात लग्न लागलं, वरात निघाली; भीषण अपघातात नवरा-नवरीसह ७ जणांचा मृत्यू

Guru Nakshatra Gochar: २८ नोव्हेंबर रोजी गुरु बदलणार नक्षत्र; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Romantic Places In Mumbai: मुंबईतील 'हे' रोमँटिक ठिकाण जेथे वाहतात प्रेमारे वारे

Ajit Pawar News : बारामतीत काका-पुतण्यात पुन्हा जुंपली, पाहा Video

SCROLL FOR NEXT