Homeguard Salary : राज्यातील 55 हजार होमगार्ड्सना दसऱ्याचं मोठं गिफ्ट, मानधन दुपट्टीने वाढलं; फडणवीसांची घोषणा

Maharashtra Homeguard Salary News : राज्यातील होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
Maharashtra Homeguard Salary News
Maharashtra Homeguard Salary NewsSaam TV
Published On

मुंबई : राज्यातील ५५ हजार होमगार्ड्सना सरकारने दसऱ्याचं मोठं गिफ्ट दिलं आहे. होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. हे मानधन देशात सर्वाधिक असल्याचंही फडणवीसांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

Maharashtra Homeguard Salary News
Manoj Jarange Patil : मराठ्यांचं वादळ नारायण गडावर धडकलं; जरांगेंच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी जमली, पाहा VIDEO

 राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नेहमीच होमगार्ड्स प्रयत्नशील असतात. मात्र, त्यांचे मानधन खूपच कमी असल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भात काहींनी आवाज देखील उठवला होता. हीच बाब लक्षात घेता काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. आज या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

ही भत्तेवाढ दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे. सदरहू सुधारित भत्ते लागू करण्यासाठी सन २०२४-२५ या वर्षाकरिता रु.५५२.७१२० कोटी इतकी अतिरिक्त रक्कम मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर दरवर्षी रुपये ७९५.७१२० कोटी रकमेची तरतूद करण्यास मान्यता देखील दिली गेली आहे.

त्यानुसार, राज्यातील होमगार्ड्सचे मानधन प्रतिदिन ५७० रुपयांवरून ते आता १०८३ रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आला आहे.

राज्यातील सुमारे ५५ हजार होमगार्ड्सना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने गेल्याच महिन्यात सुमारे ११,२०७ होमगार्ड्सची भरती प्रक्रिया राबवली होती. ती सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सद्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर फडणवीस यांनी होमगार्ड्सना दसऱ्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

Maharashtra Homeguard Salary News
Maharashtra Politics : मला विधानसभेचं तिकीट दिलं नाही तर... अजित पवार गटाचा नेता भडकला; महायुतीला दिला कडक इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com