Maharashtra Politics : मला विधानसभेचं तिकीट दिलं नाही तर... अजित पवार गटाचा नेता भडकला; महायुतीला दिला कडक इशारा

Maharashtra Political News : कारंजा विधानसभेसाठी उमेदवारी न दिल्यास वाशीम आणि रिसोड विधानसभेतही माझे कार्यकर्ते महायुतीला परिणाम दाखवून देतील असं, ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Karanja assembly constituency
Karanja assembly constituency Saam TV
Published On

मनोज जयस्वाल, साम टीव्ही

वाशीम : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून सर्वच राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुतीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून खलबतं सुरु आहे. अशातच अजित पवार गटाचे वाशिम प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी महायुतीला कडक शब्दात इशारा दिला आहे. कारंजा विधानसभेसाठी उमेदवारी न दिल्यास वाशीम आणि रिसोड विधानसभेतही माझे कार्यकर्ते महायुतीला परिणाम दाखवून देतील असं, ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Karanja assembly constituency
Maharashtra Politics : शरद पवार गटाला सर्वात मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या 25 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

चंद्रकांत ठाकरे हे कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी अजित पवार यांच्याकडे विधानसभेचं तिकीट मागितलं आहे. मात्र, हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी इथून दोनवेळा निवडून आले होते. आता त्यांचे पुत्र ग्यायक पाटणी विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

भाजपकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या गोष्टीची कुणकूण लागताच चंद्रकांत ठाकरे नाराज झाले आहेत. जागावाटपात युतीधर्माचे पालन केले जाणार असल्याने ठाकरे यांनी थेट महायुतीला इशारा दिला आहे. "उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सांगण्यावरून 2019 ची विधानसभा आणि 2024 च्या लोकसभेत थांबलो होतो".

"पण आता मात्र मला थांबायचं नाही. मी निवडणूक लढवावी अशी माझ्या निकटवर्तीयांची तसेच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांनी मला विधानसभेत उभं करण्याचं ठरवलं आहे. आगामी विधानसभेत महायुतीने उमेदवारी न दिल्यास इथे मैत्रीपूर्ण लढत होईल तसेच वाशीम आणि रिसोड विधानसभेतही माझे कार्यकर्ते महायुतीला परिणाम दाखवून देतील", असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाकरे यांच्या या इशाऱ्यामुळे महायुतीत वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तिन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेऊन हा फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यानुसार, भाजप १५५ ते १६० जागा, शिवसेना शिंदे गट ८० ते ८५ जागा आणि अजित पवार गटाला ४५ ते ५० जागा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा मित्रपक्षाला सोडल्या जाणार आहेत. लवकरच याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Karanja assembly constituency
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंनी टायमिंग साधलं, ठाकरे गटाला पुन्हा खिंडार; शेकडो शिवसैनिक शिंदे गटात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com