Ruchika Jadhav
सर्वोच्च न्यायालय म्हणजे भारतातील सर्वोच्च न्यायिक संस्था होय. याचे प्रमुख म्हणजे भारताचे सरन्यायाधीश.
आतपर्यंत भारतात ४९ सरन्यायाधीश झाले आहेत. सध्या भारताचे ५० वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आहेत.
10 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आपल्या पदावरून निवृत्त होत आहेत. त्यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत.
सरन्यायाधीश यांचे वेतन किती असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
न्यायाधीशांसाठी वेतन भत्ते कायद्यात जानेवारी २०१६ मध्ये शेवटचा बदल करण्यात आला होता. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना २.८० लाख रुपये मासिक वेतन मिळते.
तसेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना २.५० लाख रुपये दर महा वेतन मिळते.
निवृत्ती झाल्यावर सरन्यायाधीशांना १६.८० लाख रुपये तर न्यायाधीशांना १५ लाख रुपये वार्षिक पेन्शन मिळते.