Punjab Crime  Saam Tv
देश विदेश

Crime: शौचाला गेले असता अपहरण, शेतात नेऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींनी व्हिडीओ काढले अन् धमकावले

Bihar Crime: बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. शेतामध्ये नेऊन या मुलीवर चौघांनी आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Priya More

Summary:

  • बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

  • शौचाला गेले असता तिचे अपहरण करण्यात आले

  • मक्याच्या शेतात नेऊन या मुलीवर चौघांनी आळीपाळीने बलात्कार केला

  • पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला

बिहारच्या पूर्णियामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सिकटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीची आई सत्संगसाठी गेली होती. पीडित मुलगी एकटीच घराबाहेर शौचासाठी गेली होती. यावेळी आरोपींनी तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २५ मार्च रोजी घडली होती. पीडित मुलीच्या आईने शुक्रवारी सिटकी पोलिस ठाण्यात जाऊन ४ जणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चारही आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून तिला वैद्यकिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

पीडित मुलगी राहत असलेल्या गावामध्ये २३ ते २५ मार्चदरम्यान सत्संगचे आयोजन करण्यात आले होते. पीडित मुलीची आई २५ मार्च रोजी संध्याकाळी कुटुंबीयांसोबत सत्संगसाठी गेली होती. २५ मार्चच्या दिवशी पीडित मुलगी शौचासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी चार तरुणांनी तिच्या तोंडात कापड कोंबले आणि तिला मक्याच्या शेतामध्ये नेले. त्याठिकाणी त्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपींनी अश्लील व्हिडीओ देखील तयार केले.

सामूहिक बलात्कारनंतर आरोपींनी पीडित मुलीला धमकी दिली होती की, जर ही गोष्ट कुणाला सांगितली तर व्हिडीओ व्हायरल केला जाईल. घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या आईला सर्वकाही सांगितले. पीडित मुलीच्या आईने सांगितले की, ग्रामीण स्तरावर पंचायत होणार असल्यामुळे तक्रार दाखल करण्यास उशिर झाला. पोलिसांनी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीला मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT