अमानवी! निर्भायावर सामूहिक बलात्कार; दगडाने डोकं ठेचलं आणि प्रायव्हेट पार्टमध्ये बॉटल टाकली, निर्घृण हत्या

Nirbhaya Repeat Horror: एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
Police teams and forensic experts investigating the spot near Mahamaya Temple in Ambikapur where the woman's body was discovered
Police teams and forensic experts investigating the spot near Mahamaya Temple in Ambikapur where the woman's body was discoveredSaam Tv
Published On

दिल्लीतील निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती करून देणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना छत्तीसगडमधील अंबिकापूर जिल्ह्यात घडली आहे. एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. महामाया मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या फुटपाथवर या महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला.

Police teams and forensic experts investigating the spot near Mahamaya Temple in Ambikapur where the woman's body was discovered
Crime: बायकोचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, डोक्यात सिलिंडर घालत नवऱ्याने जागीच संपवलं

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल रोजी सकाळी महामाया मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेचा मृतदेह स्थानिक नागरिकांना दिसून आला. घटनेची भीषणता पाहून नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. महिलेचा चेहरा दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण केले.

Police teams and forensic experts investigating the spot near Mahamaya Temple in Ambikapur where the woman's body was discovered
'दादा मी वहिनीचा जीव घेतला...' भावाने सांगताच तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली; हत्येचे धक्कादायक कारण समोर

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. आरोपींनी केवळ बलात्कार करूनच थांबले नाहीत, तर पीडीतेच्या गुप्तांगात पाण्याची बाटली घुसवून अमानुष छळ केला. त्यानंतर तिचे डोके दगडाने ठेचून तिला जागीच ठार मारले. या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून नागरिकांनी या प्रकरणाची तुलना दिल्लीच्या 'निर्भया' प्रकरणाशी केली आहे.

Police teams and forensic experts investigating the spot near Mahamaya Temple in Ambikapur where the woman's body was discovered
Nashik Accident : नाशिक-पुणे महामार्गावर वृद्ध चालकाच्या कारचा थरार; तरुणीचा जागीच मृत्यू, ४ जखमी

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. पिडीतेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून लवकरच नराधमांना बेड्या ठोकल्या जातील असे पोलिसांनी सांगितले.

Police teams and forensic experts investigating the spot near Mahamaya Temple in Ambikapur where the woman's body was discovered
Shocking: महिला डॉक्टरवर एकतर्फी प्रेम, क्लिनिकमध्ये लावला स्पाय कॅमेरा, 3000 प्रायव्हेट व्हिडीओ अन्...

या क्रूर कृत्यामुळे स्थानिक रहिवासी आणि महिलांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. अशा नराधमांना समाजात स्थान नाही, त्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com