Uttar Pradesh Blast Saam Tv
देश विदेश

Blast: भयंकर स्फोटाने उत्तर प्रदेश हादरले, दोघांचा मृत्यू; भीषण आग अन् धुराचे लोट

Uttar Pradesh Blast: उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये भयंकर स्फोटाची घटना घडली. फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोघांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला.

Priya More

Summary -

  • भयंकर स्फोटाने उत्तर प्रदेश हादरल्याची घटना समोर आली

  • उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील सराय बरई गावात ही घटना घडली

  • फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला

  • या स्फोटामध्ये दोन जणांचा मृत्यू, अनेक जखमी झालेत

उत्तर प्रदेशमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटामध्ये दोघांचा मृत्यू झाला. दोघांच्याही शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात ही घटना घडली. फटाक्याच्या कारखान्यात हा भयंकर स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, टिकैतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराय बरई गावामध्ये ही घटना घडली. या गावामध्ये असणाऱ्या फटाक्याच्या कारखान्यात दुपारच्या सुमारास स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण गाव हादरले. स्फोट झाल्यानंतर सर्वजण घाबरून सैरावैरा पळू लागले. या स्फोटामध्ये कारखान्यामध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्या. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. या स्फोटामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झाल्यानंतर त्याच ठिकाणी स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. ही घटना फटाके आणि गनपावडरच्या बेकायदेशीर साठवणुकीमध्ये झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून फॉरेन्सिक टीम देखील आली आहे. पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. मदत आणि बचावकार्य देखील युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांकडून गावकऱ्यांची चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात भाजपला धक्का,नेत्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

Kalyan News: धक्कादायक! १९ व्या मजल्यावरून उडी घेत १४ वर्षीय मुलीची आत्महत्या, हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्हीत कैद

Palghar Tourism : वीकेंडला करा जोडीदारासोबत ट्रेकिंगचा प्लान, पालघरमध्ये आहे सुंदर डेस्टिनेशन

महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत क्षुल्लक कारणावरुन वाद

SCROLL FOR NEXT