Manasvi Choudhary
मंगळसूत्र हे केवळ सौभाग्यलेणं नसून ते महिलांच्या सौंदर्याचे दागिना म्हणून देखील ओळखला जातो.
मंगळसूत्राचे अनेक डिझाईन्स आहेत जे तुम्ही खास वेस्टर्न आणि एथनिक लूकवर निवडू शकता.
मंगळसूत्रामध्ये वाटी मंगळसूत्र हा फार जुना पॅटर्न आहे यामध्ये आता अनेक नवीन युनिक डिझाईन्स आल्या आहेत.
पारंपारिक सोनेरी वाटी मंगळसूत्रामध्ये वाटी पेडंटला बारीक मोत्यांची डिझाईन असते. नऊवारी आणि काठपदरी साडीवर अधिक उठून दिसते.
सोन्याच्या वाटीवर किंवा वाटीच्या आकारातच बारीक पांढरे किंवा रंगीत खडे बसवलेले असतात.यामुळे मंगळसूत्राला हिऱ्यासारखी चकाकी मिळते. रिसेप्शन किंवा पार्टीसाठी हे मंगळसूत्र साडी व ड्रेसवर भारी दिसते.
सिंपल सोबर हलके मंगळसूत्र म्हणून तुम्ही लांब मंगळसूत्र निवडू शकता काळ्या मण्यांचे हे मंगळसूत्र असते ज्याला फक्त डायमंड वर्क केलेला पेडंट असतो.
ऑफिसला जाणाऱ्या किंवा दररोजच्या वापरासाठी शॉर्ट मंगळसूत्राचा महिलांची पसंती आहे. यात एका लहान सोन्याच्या वाटीसोबत दोन्ही बाजूंना एक-एक मोती किंवा खडा असतो.