Manasvi Choudhary
आजकाल मंगळसूत्र हे केवळ परंपरा म्हणूनच नाही तर एक फॅशन स्टेटमेंट देखील प्रसिद्ध आहे.
मंगळसूत्र हे केवळ साडीवरच नाही तर ड्रेस आणि जिन्स टॉपवर देखील तुम्ही परिधान करू शकता. यासाठी मंगळसूत्राच्या काही युनिक पॅटर्न्स आहेत.
नाजूक काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आणि मध्यभागी हिरा असा पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहे. साधे आणि सिंपल हे पॅटर्न तुम्ही निवडू शकता.
इन्फिनिटी हे चिन्ह प्रेमाचे प्रतीक मानले जाते. इंडोवेस्टर्न लूकवर तुम्ही हे मंगळसूत्र पॅटर्न निवडू शकता.
मंगळसूत्राच्या पेडंटमध्ये हार्ट शेपचे तुम्ही डिझाईन निवडू शकता नाजूक आणि प्रेमाच्या नात्यासाठी हे पॅटर्न तुम्ही निवडू शकता.
लेयर्ड मंगळसूत्र पॅटर्नमध्ये सोन्याच्या चैनच्या दोन ते तीन लेयर्ड असतात यामुळे हे पॅटर्न थोडे हटके आणि युनिक दिसते.
सोन्यासोबतच तुम्ही रोझ गोल्ड मंगळसूत्र निवडू शकता हे मंगळसूत्र इंडो वेस्टर्नलूकवर अधिक उठून दिसते.