

प्रत्येक व्यक्तीला ऋतू बदलतो त्याप्रमाणे आजारांमध्येही बदल जाणवतो. हाच बदल तुमच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात तुम्हाला जाणवत असतो. लहान मुलांची दुखणी आजारपणं वेगळी असतात. तशीच जसजसं वय वाढत जातं, त्यानुसार आजारातही बदल होतात. पण वाढत्या वयात एखादा आजार झाला तर तो खूप जीवघेणा ठरु शकतो. कारण बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना वयाच्या चाळिशीतच गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यातले आजार म्हणजे हार्ट अटॅक किंवा ह्रदयासंबंधीत आजारही असू शकतात.
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेला ताण हा सुद्धा या आजाराचं कारण ठरू शकतो. कारण साधारण वयाची चाळिशी ओलांडली तर अनेकांना ब्लड प्रेशरच्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. सध्या ही समस्या खूप कॉमन झालीये. कारण अनेकांना याची लक्षणं काय असतात? कशामुळे होतात? याबद्दल माहितच नसतं. मग त्यावर उपचार उशीरा होतात. पण तोपर्यंत तुमचा बीपी एकतर हाय झालेला असतो किंवा एकदम लो झालेला असतो. जर यावर वेळेवर उपचारच केले नाहीत, दुर्लक्ष केलंत तर हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनीचे आजार तुम्हाला होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते ब्लड प्रेशरचा त्रास अनेक कारणांमुळे होऊ शकतो. त्यामध्ये दिवसभर बसून राहणं, जंक फूडचं सेवन, ताणतणाव, लठ्ठपणा आणि आनुवंशिक कारणांमुळे कोणालाही हाय बीपी होऊ शकतो. अनेकांना वाटतं जेवणात मीठाचं प्रमाण कमी म्हणजे आपण एकदम फीट आहोत. पण हा चुकीचा समज आहे. मीठ जरी नसलं तर त्यांचा आहारात पॅकेज्ड फूड्स, चिप्स, बिस्किटं, लोणची, ब्रेड आणि इंस्टंट नूडल्स असतातच.
यामध्ये असणार मीठ तुमच्या रक्तदाबावर परिणाम करत असतं. त्यामुळे तुमच्या आहारात योग्यता असली पाहिजे. रोज लवकर उठणं, मुळात त्यासाठी वेळेवर झोपणं, योग्य वेळी जेवणं, आहारात चांगल्या पदार्थांचाच समावेश करणं, रोज किमान अर्धा तास व्यायाम करणं या सवयी चाळिशीतल्यांनी रोजच्या रोज फॉलो केल्या पाहिजेत.
टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.