Blood Pressure Control google
लाईफस्टाईल

Blood Pressure Control: BP नियंत्रणात ठेवायचाय? हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? 'ही' ४ फळं खायला करा सुरू, डॉक्टरांनी दिली महत्त्वाचा सल्ला

Heart Health: उन्हाळ्यात वाढणाऱ्या ब्लड प्रेशरचा धोका कमी करण्यासाठी केळी, बीट, डाळिंब आणि डार्क चॉकलेट यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास हृदय निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.

Sakshi Sunil Jadhav

सध्या उन्हाळा वाढत चालला आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात बदल होत आहेत. बदल म्हणण्यापेक्षा आता भूक कमी आणि पाणी जास्त प्रमाणात लोक पित आहेत. त्यामुळे अनेकांना कमकुवतपणाची लक्षणे जाणवतात. त्यात जर तुम्ही हार्टचे पेशन्ट असाल तर तुम्हाला या दिवसात खूप काळजी घ्यावी लागते. कारण उन्हामुळे तुमच्या शरीराला सतत खाम येतो. त्याने बऱ्याच जणांना चालताना दम लागतो. त्याचा परिणाम तुमच्या हार्टवर किंवा ह्रदयाच्या धडधडीवर होतो आणि तुमचा ब्लड प्रेशर वाढतो.

तुम्हाला जर या उन्हाळ्यात स्वत: वर कंट्रोल ठेऊन रक्तदाब नियंत्रणात आणायचा असेल तर ही बातमी योग्य आहे. पुढील लेखात आपण याबद्दल तज्ज्ञांचे सल्ले आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येईल असा आहार जाणून घेणार आहोत.

World Health Organization च्या माहितीनुसार, जगातल्या 1.4 अब्ज लोकांना हाय ब्लड प्रेशरच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. कारण त्यांना बीपीचा त्रास आहे, हे फार उशीरा कळतं. तसेच त्यांच्या आहारात काही बेसिक पदार्थांचा किंवा फळांचा समावेश नसतो. त्याने भविष्यात रुग्णांना हार्ट अटॅक स्ट्रोक किंवा किडनीच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कॅलिफोर्नियामधील गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट आणि Dr Saurabh Sethi यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही नैसर्गिक पदार्थांचा उल्लेख केला आहे, जे रोजच्या आहारात समाविष्ट केल्यावर रक्तदाब कमी राहण्यास मदत होऊ शकते.

केळी खाण्याचे फायदे

केळी खाल्याने तुमच्या BP नियंत्रणात येतो. त्यामध्ये पोटॅशिअम असतं जे किडनीसाठीही फायदेशीर असतं. रोज किमान २ केळी खावीत.

डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे

डार्क चॉकलेट खाल्ल्याने रक्तवाहिन्या सैल होतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. कारण त्यामध्ये ग्नेशियम आणि फ्लॅवनॉल्स असतात. रोज १ तुकडा सुद्धा पुरेसा आहे.

बीट खाण्याचे फायदे

रोज आहारासोबत बीट खाल्याने ब्लड प्रेशर कमी होतो. बीटात नैसर्गिक नायट्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात आणि रक्तप्रवाह सुधारतो. बीटाचा रस, स्मूदी किंवा सलाडमध्ये बीटाचा वापर केल्याने त्याचा फायदा होऊ शकतो.

डाळिंब खाण्याचे फायदे

डाळिंब हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध फळ आहे. त्यातले पॉलीफेनॉल्स रक्तदाब कमी करण्याचं काम करतात. संशोधनानुसार डाळिंबाचा रस एंजियोटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाइम (ACE) चं प्रमाण कमी करण्यास मदत करतो.

टीप: तज्ज्ञांच्या मते, या अन्नपदार्थांचा नियमित आणि संतुलित आहारात समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र कोणताही आहार बदल करण्यापूर्वी किंवा आरोग्यविषयक उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thigh length and diabetes: मांडीची लांबी सांगणार टाईप-२ मधुमेहाचा धोका? नव्या अभ्यासातून धक्कादायक संकेत

Dahi Handi Holiday : मोठी बातमी! दहीहंडीची सरकारी सुट्टी रद्द, आता 'या' सणाला मिळणार सुट्टी; वाचा फडणवीस सरकारचा निर्णय

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिका वाहन चालक आक्रमक

Maharashtra Cabinet Decision: फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय, भूसंपादन मोबदल्याच्या व्याजदरात केला बदल

शिंदेंना मुख्य नेता हे पद कुणी दिलं? धनुष्यबाण दिलाच कसा?, ठाकरेंच्या वकिलांचा आयोगावर शाब्दिक बॉम्ब, कोर्टात काय झालं?

SCROLL FOR NEXT