Coconut Water Vs Glucose: नारळ पाणी की ग्लुकोज? कडाक्याच्या उन्हात काय पिणं योग्य? वाचा...

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळ्यात होणाऱ्या समस्या

उन्हाळ्यात जास्त घाम आल्यामुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि मिनरल्स बाहेर पडतात. त्यामुळे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता वाढते.

summer hydration drinks

अनेकांच्या मनातला प्रश्न

उन्हात शरीराला पुन्हा हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी, नारळ पाणी किंवा ग्लुकोज घेतले जाते. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो की शरीराला पटकन हायड्रेट करण्यासाठी नारळ पाणी चांगले की ग्लुकोज? जाणून घ्या याबाबतची महत्त्वाची माहिती.

summer hydration drinks

नारळ पाणी

नारळ पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ते खूप प्रभावी ठरतं.

best drink in summer heat

शरीराला थंडावा जाणवणे

नारळ पाणी शरीराला थंड ठेवण्याचं काम करतं. त्यामुळे उष्माघात किंवा लूचा धोका कमी करण्यास मदत होते.

coconut water benefits

वजनावर होणारा परिणाम

नारळ पाण्यात कॅलरी कमी असतात. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंक्स किंवा गोड पेयांपेक्षा हा अधिक आरोग्यदायी पर्याय मानला जातो.

glucose water benefits

ग्लुकोजचा फायदा

ग्लुकोज पचन प्रक्रियेशिवाय थेट रक्तात मिसळतो. त्यामुळे थकवा किंवा अशक्तपणा जाणवल्यावर शरीराला लगेच ऊर्जा मिळते.

glucose water benefits

मेंदू आणि स्नायूं

ग्लुकोज मेंदूसाठी महत्त्वाचा ऊर्जा स्त्रोत आहे. तसेच जास्त व्यायाम किंवा शारीरिक श्रमानंतर स्नायूंची रिकव्हरी जलद करण्यास मदत करतो.

glucose water benefits

डिहायड्रेशनच्या समस्या

खूप अशक्तपणा, चक्कर किंवा तीव्र डिहायड्रेशन झाल्यास ग्लुकोज पाणी त्वरित ऊर्जा आणि हायड्रेशन देण्यास मदत करू शकते.

dehydration prevention tips

योग्य काय?

दररोजच्या हायड्रेशनसाठी आणि शरीरातील मिनरल्सची कमतरता भरून काढण्यासाठी नारळ पाणी अधिक फायदेशीर मानले जाते.

summer health tips

NEXT: Gudi Padwa 2026: खुशखबर! गुढीपाडव्याला नवा फोन खरेदी करणाऱ्यांनी iPhone ची किंमत एकदा वाचाच

iphone bank offer india
येथे क्लिक करा