Prajakta Mali : 'फुलवंती'ची नवी इनिंग, प्राजक्ता माळी झाली शिक्षिका

Shreya Maskar

प्राजक्ता माळी

'महाराष्ट्राची हास्य जत्रा'ची होस्ट प्राजक्ता माळी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिला 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली.

Prajakta Mali | instagram

फुलवंती

'फुलवंती' या चित्रपटातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. आता अभिनेत्री प्राजक्ता माळी शिक्षिका झाली आहे. गेले काही दिवस अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. आता तिने धमाकेदार कमबॅक केला आहे.

Prajakta Mali | instagram

प्राजक्ता बनली शिक्षिका

प्राजक्ता माळी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅपीनेस प्रोग्रॅमची शिक्षिका झाली आहे. याची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे.

Prajakta Mali | instagram

प्राजक्ता माळीची पोस्ट

प्राजक्ता माळीने पोस्टमध्ये म्हटले की, "गुरूंच्या कृपेने...आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅपीनेस प्रोग्रॅमची शिक्षिका झाले. 15 दिवसांचे तीव्र शारीरिक, मानसिक, भावनिक प्रशिक्षण... फोन आणि बाहेरचे अन्न न घेता.दररोज पद्मसाधना आणि बरेच काही जे शब्दांत सांगता येणार नाही...."

Prajakta Mali | instagram

लवकरच शिकवायला सुरुवात...

प्राजक्ता त्यापुढे म्हणाली की, "हो, मी लवकरच शिकवायला सुरुवात करणार आहे. संपर्कात रहा. मी अजिबात फिल्म इंडस्ट्री सोडून कुठेही जाणार नाहीये. मी या दोघांमध्ये समतोल साधिन, अगदी गेल्या 8 वर्षांपासून मी जसे करत आलो आहे, तसेच..."

Prajakta Mali | instagram

शुभेच्छांचा वर्षाव

प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकरी, चाहते कमेंट्स करत आहेत. तिला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. तसेच तिच्यासाठी प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

Prajakta Mali | instagram

वेब सीरिज

अलिकडेच प्राजक्ता माळी 'देवखळ' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या प्राजक्ता मराठी अभिनेता अंकुश चौधरीसोबत झळकली आहे. या सीरिजसा प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाला.

Prajakta Mali | instagram

अष्टपैलू व्यक्तिमत्व

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ती एक उत्तम अभिनेत्री, निर्माती, व्यवसायिका, कवियत्री आहे. तिचा 'फुलवंती' चित्रपट जगभरात खूप गाजला.

Prajakta Mali | instagram

NEXT : रंग, प्रेम अन् आनंदाने भरलेला रश्मिका-विजयचा हळदी समारंभ, रोमँटिक PHOTOS आले समोर

Rashmika - Vijay Haldi | instagram
येथे क्लिक करा...