Police investigate the hotel room in Agra where a woman allegedly murdered her lover following an argument saam tv
देश विदेश

अनैतिक संबंधांचा भयानक शेवट! विवाहित प्रेयसीनं प्रियकराला हॉटेलमध्ये नेलं, डोकं ठेचून हत्या केली, मृतदेहाजवळ बसून रडली

Married Woman Kills Lover In Hotel Room In agra: आग्रामध्ये अनैतिक संबंधातून धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आले. विवाहित महिलेने हॉटेलमध्ये प्रियकराचा निर्घृण खून करत मृतदेहाजवळ बसून कबुली दिली.

Omkar Sonawane

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील इटौरा भागात शुक्रवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. इटौरा चौकातील एका हॉटेलमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकराची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. दुपारी 12च्या सुमारास ही घडली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपुर सीकरी येथील रहिवासी असलेला तरुण एका विवाहित महिलेसोबत इटौरा चौकातील हॉटेलमध्ये आला होता. दोघांनी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील एक खोली भाड्याने घेतली. काही वेळानंतर दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात महिलेने तरुणावर जड वस्तूने हल्ला केला. तरुण जागीच खाली कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्यानंतर महिलेने त्याचे डोके ठेचले आणि धारदार शस्त्राने गळा चिरून त्याला जागीच संपवले.

हत्येनंतर मृतदेहाजवळच बसून राहिली महिला

हत्येच्या घटनेनंतर महिला स्वतःच मोठ्याने ओरडून हत्येची कबुली देऊ लागली. तिचा आवाज ऐकून हॉटेल कर्मचारी खोलीकडे धावले. तिथे रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह पडलेला होता आणि महिला तिथेच बाजूला बसून होती. हॉटेल चालकाने तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ती महिला विवाहित असून तिला एक मूल देखील आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असून परिसरात खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

SCROLL FOR NEXT