Shocking : बहिणीचा मृत्यू,भावानं बाथरुममध्येच केले अंत्यसंस्कार; अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानं खळबळ

Shocking Crime News: गोविंदपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीने आपल्या बहिणीवर बाथरूममध्ये अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आहे.
Police investigate shocking case after half-burnt body of woman found inside house bathroom.
Police investigate shocking case after half-burnt body of woman found inside house bathroom.
Published On
Summary
  • गोविंदपूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस

  • भावाने बहिणीच्या मृतदेहावर बाथरूममध्ये अंत्यसंस्कार केले

  • अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ

गोविंदपूर पोलीस स्टेशनच्या परिसरात अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एक व्यक्ती आपल्या घरातील बाथरुममध्ये एका महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत होता. शेजाऱ्यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आहे. पोलिसांनी जेव्हा या व्यक्तीची चौकशी केली तेव्हा पोलीस चक्रावून गेले.

Police investigate shocking case after half-burnt body of woman found inside house bathroom.
Crime News: बायकोचं मित्रासोबत अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याने रचला भयंकर कट, दोस्ताच्या छातीत गोळ्या झाडल्या अन्...

पोलिसांनी ज्या व्यक्तीला ताब्यात घेतलं, तो त्याच्याच बहिणीचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करत होता. ही धक्कादायक घटना एका कॉलनीतील वास्तू विहार नावाच्या घरात घडली. तर मृत महिलेचं नाव लिपिका कुमारी वय ३६ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे घर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड फ्युएल रिसर्च (CIMFR) येथील निवृत्त शास्त्रज्ञ संगीत कुमार यांचे होते. त्यांचे २०२३ मध्ये निधन झाले आहे. त्यांच्या घरात त्यांची मुलगी लिपिका, तिचा भाऊ प्रणव राजवर्धन (५०) याच्यासोबत राहत होती.

Police investigate shocking case after half-burnt body of woman found inside house bathroom.
Nagpur : डेटिंग अ‍ॅपवर तरुणाशी ओळख, बारमध्ये भेटायला बोलावलं; तरुणीने नंतर जे काही केलं ते चक्रावून टाकणारं...

लिपिकाचा घटस्फोट झालेला होता. मृत महिला लिपिकाचा दुसरा भाऊ आपल्या कुटुंबासह सुमारे २ किमी अंतरावरील एका घरात राहत होता. सोमवारी लिपिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा भाव प्रणव राजवर्धन त्याच्या बहिणीच्या मृतदेहावर घरातील बाथरुममध्येच अंत्यसंस्कार करत होता. त्यासाठी त्याने घराशेजारील लोकांची मदत मागितील मात्र त्यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

स्थानिक रहिवाशांनी दावा केला की, लिपिका नैराश्यग्रस्त होती. तसेच प्रणवलाही मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या. काही दिवसापासून हे कुटुंब समाजापासून दूर गेले होते. ते अलिप्त राहत होते. शेजाऱ्यांशीही क्वचितच बोलायचे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी कोणतीच दुजोरा दिला नाहीये. त्यांनी याबाबत कोणतीच माहिती दिली नाहीये. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण आणि इतर बाबी स्पष्ट होतील, असे सांगितले. स्थानिक सूत्रांनुसार, लिपिकाचा मृत्यू ७ एप्रिलच्या रात्री झाला होता.

प्रणवने तिच्या मृत्यूची माहिती शेजाऱ्यांना दिली होती, परंतु त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही किंवा कोणतीही मदत केली नाही. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, घाबरलेल्या अवस्थेत भावाने बाथरूममध्येच मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने संशय आल्याने शेजाऱ्यांनी सोमवारी पोलिसांना माहिती दिली.

प्रणवला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. “पोलिसांनी फ्लॅटमधून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल,” अशी माहिती गोविंदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विष्णू राऊत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com