Saam Tv
देश विदेश

Shocking News: लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकला, पाहुण्याचा तडफडून मृत्यू

Man Dies After Sweet Stuck In Throat: रसगुल्ला खाताना घशात अडकल्यामुळे ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. लग्नामध्ये जेवताना ही भयंकर घटना घडली. त्यामुळे लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.

Priya More

Summary -

  • झारखंडमध्ये लग्नसोहळ्यात धक्कादायक घटना घडली

  • रसगुल्ला खाताना घशात अडकल्याने ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  • ललित सिंह यांना तात्काळ रुग्णालयात नेले पण उपचारापूर्वीच मृत्यू त्यांचा झाला

  • अन्न श्वासनलिकेत अडकल्यामुळे श्वास गुदमरल्याचे त्यांचा मृत्यू झाला

लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. झारखंडच्या जमशेदपुरमध्ये ही घटना घडली. याठिकाणी एमजीएम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलियंता गावामध्ये लग्नासाठी आलेल्या एका वऱ्हाडीचा मृत्यू झाला. ४१ वर्षीय ललित सिंह यांच्या घशामध्ये रसगुल्ला अडकला आणि त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ४१ वर्षीय ललित सिंह लग्नासाठी मलियंता गावात आले होते. लग्न लागल्यानंतर ते जेवायला गेले. जेवत असताना त्यांनी रसगुल्ला खाल्ला. पण रसगुल्ला त्यांच्या घश्यात अडकला. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

रसगुल्ला खाल्ल्यानंतर ललित सिंग यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यामुळे लग्नात आलेल्या वऱ्हाडींनी त्यांना तात्काळा रुग्णालयात हलवले पण तोपर्यंत उशिर झाला. रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम केल्यानंतर ललित यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. या घटनेमुळे ललितच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

ललित सिंग यांच्या मृत्यूबाबत लोकांमध्ये बरीच चर्चा झाली. डॉक्टरांनी ललित यांच्या मृत्यूमागील खरे कारणही सांगितले. या प्रकरणाची माहिती देताना एमजीएम रुग्णालयाचे डॉ. रोहित झा म्हणाले की, एपिग्लॉटिस ही एक ग्रंथी आहे जी अन्न श्वासनलिकेत जाण्यापासून रोखते, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती मद्यपान करते किंवा बोलत असताना खाताना ही ग्रंथी काम करत नाही. यामुळे अन्न श्वासनलिकेत अडकते ज्यामुळे मृत्यूचा धोका असतो. म्हणून जेवताना बोलू नये किंवा विनोद करू नये. त्याचसोबत दारू पिताना जेवण करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! LPG सिलेंडरच्या नियमात मोठे बदल! सामान्यांना दिलासा?

HSC Result 2026 : बारावीच्या निकालाची तारीख अन् वेळ ठरली, mahahsscboard.in वर पाहा रिझल्ट

Maharashtra News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात तापमान ४२° पार; उष्माघाताचा धोका वाढला

जाडी बायको असणारे पुरुष आयुष्यात सर्वाधिक आनंदी, नव्या संशोधनात नेमकं काय?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, तब्बल ९० प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, धक्कादायक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT