Madhya Pradesh News Saam Tv
देश विदेश

Madhya Pradesh News: धक्कादायक! तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधत कुत्र्यासारखं भुंकायला लावलं

Bhopal Police: मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये (Bhopal) ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.

Priya More

Madhya Pradesh Viral Video: मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाच्या गळ्यामध्ये पट्टा बांधून त्याला कुत्र्यासारखे भुंकायला लावलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये (Bhopal) ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असून त्यावर नेटिझन्स संताप व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी संबंधित व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिलेत. गृहमंत्री निरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, 'व्हायरल होणारा तरुणाचा व्हिडिओ पाहिला. अशी वागणूक देणं अत्यंत दुर्दैवी आहे. भोपाळ पोलीस आयुक्तांना व्हिडिओची सत्यता तपासून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.'

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका तरुणाच्या गळ्याला पट्टा बांधला आहे. काही तरुणांच्या टोळीतील एका तरुणाने हा पट्टा हातामध्ये पकडून पीडित तरुणाला रस्त्यावर गुडघ्यावर बसवले आहे. काही तरुण व्हिडिओ शूट करत या तरुणाला जाब विचारत आहेत. यावेळी तरुणांची टोळी पीडित तरुणाला कुत्र्यासारखे भूक असे सांगतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे.

व्हिडीओत पीडित तरुण म्हणतो, 'साहिल माझे वडील आहेत. तो माझा मोठा भाऊ आहे. त्याची आई माझी आई आहे. मी सॉरी बोललो आहे. मी काही केलं नाही.' त्यानंतर एक तरुण व्हिडिओ अपलोड करायला तुला कोणी सांगितले असे पीडित तरुणाला विचारतो. त्यावर पीडित तरुण सांगतो की, 'मी शाहरूखच्या सांगण्यावरून व्हिडीओ अपलोड केला. तो मला धमकावत होता.'

या घटनेप्रकरणी साहिल आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी अमली पदार्थाचे सेवन करून धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसंच आमच्या मुलाला स्वत:च्या घरी चोरी करण्यासही भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या या घटनेमुळे भोपाळमध्ये खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पीडित तरुणाच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी टाळाटाळ केली असल्याचा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी केला होता. पण या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला. तेव्हा पोलिसांनी तरुणांच्या टोळीविरोधात धर्मांतरविरोधी कायदा आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास भोपाळ पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

SCROLL FOR NEXT