Asian Games 2023: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! शिवम शेट्टीला सुवर्ण तर नम्रता तायडेला रौप्यपदक

Shivam Tayde And Shivam Shetty: शिवम शेट्टी व नम्रता तायडे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान पटकावले आहे.
 Shivam Tayde And Shivam Shetty
Shivam Tayde And Shivam Shettysaam tv
Published On

बीड - गुजरात येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी निवड चाचणी मध्ये भारतीय संघामध्ये महाराष्ट्राचे स्टार खेळाडू शिवम शेट्टी व नम्रता तायडे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय स्थान पटकावले आहे. या दोघांचीही "इंडिया कॅम्प" साठी निवड झाली आहे.

 Shivam Tayde And Shivam Shetty
R Ashwin On WTC Final: 'गोलंदाज असल्याचा आयुष्यभर पश्चात्ताप होईल..',निवृत्तीबाबत बोलताना अश्विनचं मोठं वक्तव्य

आगामी १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा, हँगजाऊ, चायना येथे होणार आहेत. त्यासाठी तायक्वांदो या खेळाची निवड चाचणी स्पर्धा १६ ते १८ जून २०२३ या कालावधीत गुजरात क्रीडा प्राधिकरण, नडियाद येथे पार पडली. या निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्रातील २ खेळाडूंची निवड "इंडिया कॅम्प" साठी करण्यात आली आहे.

त्यामध्ये महाराष्ट्राचे खेळाडू कु. नम्रता तायडे ६७ किलो वरील आणि शिवम शेट्टी ६३ किलो खालील वजनी गटामध्ये निवड झाली आहे. अंतिम निवड ५० दिवसाच्या इंडिया कॅम्प नंतर करण्यात येईल.

हा कॅम्प १ जुलैपासून स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, लखनऊ येथील कॅम्प मध्ये होणार आहे. त्यानंतर या भारतीय टीम ला "फॉरेन एक्सपोजर" साठी ३० दिवस विदेशात विशेष प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. (Latest sports updates)

 Shivam Tayde And Shivam Shetty
R Ashwin On WTC Final: 'मला ४८ तासांपूर्वीच कळालं होतं..' WTC च्या अंतिम सामन्यात न खेळविण्याबाबत Ashwin चा मोठा गौप्यस्फोट!

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम या दोन खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांनी केले आहे. या कामगिरीसाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक प्रवीण बोरसे सर व राष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण सोनकुल सर या दोन्ही प्रशिक्षकांचेही विशेष अभिनंदन होत आहे.

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, शिव छत्रपती पुरस्कार विजेते महासचिव मिलिंद पठारे , उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, सहसचिव सुभाष पाटील , कोषाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, निरज बोरसे, अजित घाडगे, सतीश खेमसकर व सर्व जिल्हा संघटनांचे पदाधिकारी यांच्याकडून दोन्हीं खेळाडूंवर आणि प्रशिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव केला गेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com