R Ashwin On WTC Final: 'गोलंदाज असल्याचा आयुष्यभर पश्चात्ताप होईल..',निवृत्तीबाबत बोलताना अश्विनचं मोठं वक्तव्य

R Ashwin: अंतिम सामना होऊन १ आठवडा झाल्यानंतर आर अश्विनने निवृत्तीबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.
r ashwin
r ashwin saam tv
Published On

Team India: भारतीय संघाने दमदार कामगिरी करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी गमावली आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यात संधी न मिळालेला आर अश्विन प्रचंड चर्चेत राहिला.

आता अंतिम सामना होऊन १ आठवडा झाल्यानंतर आर अश्विनने निवृत्तीबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

r ashwin
R Ashwin On WTC Final: 'मला ४८ तासांपूर्वीच कळालं होतं..' WTC च्या अंतिम सामन्यात न खेळविण्याबाबत Ashwin चा मोठा गौप्यस्फोट!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा केली गेली, त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण प्लेइंग ११ मध्ये आर अश्विनचे नाव नव्हते. हे पाहून अनेक दिग्गजांनी टीकेचा वर्षाव देखील केला होता. आर अश्विनने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'मला अंतिम सामना खेळायचा होता. कारण भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मी देखील मोलाचं योगदान दिलं आहे. '

आर अश्विनला निवृत्तीनंतर एका गोष्टीचा पश्चाताप होणार आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, 'उद्या जेव्हा मी निवृत्त होणार, तेव्हा मला एका गोष्टीचा पश्चाताप होईल. मी चांगला फलंदाज असूनही गोलंदाज व्हायला नको होतं. मी नेहमीच या गोष्टीशी लढत आलो आहे. मी अनेकदा पाहिलं आहे की, गोलंदाज आणि फलंदाजाला वेगळी वागणूक दिली जाते. दोघांसाठी मापदंड नेहमीच वेगळे असतात.' (Latest sports updates)

r ashwin
R Ashwin DRS In TNPL: अश्विन अण्णा रॉक्स! DRS निर्णयावरही घेतला पुन्हा DRS, सगळेच चक्रावले; पुढे काय झालं पाहा VIDEO

मला ४८ तासांपूर्वीच माहित पडलं होतं..

तसेच तो पुढे म्हणाला की, ' मला आनंद आहे की, त्यांना असं जाणवलं की मी खेळण्यासाठी योग्य आहे. मात्र सत्य हे आहे की, मला खेळायची संधी नाही मिळाली आणि संघाला ट्रॉफी ही नाही मिळाली. मला ४८ तासांपूर्वी माहीत पडलं होतं की, मला खेळायची संधी मिळणार नाही. माझं लक्ष्य हेच होतं की, मला संघाच्या विजयात शक्य होईल ते योगदान द्यायचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com