R Ashwin DRS In TNPL: अश्विन अण्णा रॉक्स! DRS निर्णयावरही घेतला पुन्हा DRS, सगळेच चक्रावले; पुढे काय झालं पाहा VIDEO

TNPL 2023: आर अश्विन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
r ashwin
r ashwintwitter
Published On

R Ashwin In TNPL 2023: भारतीय संघातील फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) हा दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप(WTC) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळायची संधी मिळाली नव्हती. आता तो तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

आर अश्विन घातक गोलंदाजांपैकी एक आहे. जो चेंडू टाकून तर विकेट घेतोच, मात्र चेंडू न टाकता देखील विकेट घेऊ शकतो. दरम्यान आता तो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

r ashwin
Suryakumar Yadav: मिस्टर ३६० ला बॉलिंग करताना पाहिलंय का? कारकिर्दीतील सर्वोत्तम चेंडू टाकत घेतला भन्नाट कॅच; VIDEO पाहायलाच हवा

आयपीएल संपल्यानंतर आता तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत बुधवारी (१४ जून) डींडीगुल ड्रॅगंस आणि त्रिची हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात आर अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या डींडीगुल ड्रॅगंस संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या संघाने त्रिची संघाला अवघ्या १२० धावांवर रोखलं होतं.

फलंदाजानंतर अश्विनने केली DRS ची मागणी..

आर अश्विनने या सामन्यात गोलंदाजी करताना २ गडी बाद केले. मात्र त्याने अस काहीतरी केलं, जे पाहून सर्वच चक्रावून गेले. त्रिची संघाची फलंदाजी सुरू असताना १३ वे षटक टाकण्यासाठी आर अश्विन गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाज मोठा फटका खेळण्यात अपयशी ठरला. त्याचवेळी कॅचची अपील झाली आणि अंपायरने त्याला बाद घोषित केलं.

अंपायरने बाद घोषित करताच फलंदाजाने DRS ची मागणी केली. DRS घेतल्यानंतर स्पष्टपणे दिसून येत होतं की, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नव्हता. बॅट खेळपट्टीला घासून गेली होती. त्यामुळे तिसऱ्या अंपायरने निर्णय बदलला आणि त्याला नाबाद घोषित केले. हा निर्णय येताच आर अश्विनने DRS ची मागणी केली. (Latest sports updates)

आर अश्विनने तिसऱ्या अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं. मात्र यावेळी देखील तो नाबाद असल्याचं दिसून आलं. एका विकेटसाठी फलंदाज आणि गोलंदाजाने DRS ची मागणी केल्याची ही पहिलीच वेळ असावी. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com