R Ashwin On WTC Final: 'मला ४८ तासांपूर्वीच कळालं होतं..' WTC च्या अंतिम सामन्यात न खेळविण्याबाबत Ashwin चा मोठा गौप्यस्फोट!

R Ashwin: आता १ आठवड्यानंतर आर अश्विनने याबाबत भाष्य केलं आहे.
r ashwin
r ashwinsaam tv
Published On

Team India: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. लंडनच्या ओव्हल मैदानावर रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची दुसरी संधी मिळाली होती. मात्र ही संधी देखील हातातून निसटली आहे. या पराभवानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यावेळी त्याने प्लेइंग ११ ची यादी जाहीर केली, त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला. या यादीत आर अश्विनचं नाव नव्हतं. आता १ आठवड्यानंतर आर अश्विनने याबाबत भाष्य केलं आहे.

r ashwin
Eng vs Aus,Ashes 2023: कुठे, केव्हा आणि कधी रंगणार Ashes मालिकेचा थरार? संपुर्ण माहिती जाणून घ्या एकाच Click वर

भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचवण्यात आर अश्विनचं मोलाचं योगदान आहे. मात्र निर्णायक सामन्यात त्याला संघाबाहेर ठेवलं गेलं होतं. या सामन्यात खेळण्याची संधी न मिळाल्याने आर अश्विन नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले की, ' मला अंतिम सामन्यात खेळायचं होतं. कारण भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहचवण्यात माझं देखील योगदान आहे. गतवर्षी झालेल्या अंतिम सामन्यात मी चांगली गोलंदाजी करत ४ गडी बाद केले होते. २०१८-१९ नंतर परदेशात देखील माझी कामगिरी चांगली राहिली आहे. मी सामना जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.' (Latest sports updates)

r ashwin
R Ashwin DRS In TNPL: अश्विन अण्णा रॉक्स! DRS निर्णयावरही घेतला पुन्हा DRS, सगळेच चक्रावले; पुढे काय झालं पाहा VIDEO

तसेच तो पुढे म्हणाला की, ' मी हे कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या नजरेतून पाहतोय आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा आम्ही शेवटचा इंग्लंड दौरा केला होता, त्यावेळी मालिका २-२ ने बरोबरीत सुटली होती. संघाला असं जाणवलं की, ४ वेगवान गोलंदाज आणि १ फिरकी गोलंदाज हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. अंतिम सामन्यात त्यांना असंच काहीतरी वाटलं असावं.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' मला आनंद आहे की, त्यांना असं जाणवलं की मी खेळण्यासाठी योग्य आहे. मात्र सत्य हे आहे की, मला खेळायची संधी नाही मिळाली आणि संघाला ट्रॉफी ही नाही मिळाली. मला ४८ तासांपूर्वी माहीत पडलं होतं की, मला खेळायची संधी मिळणार नाही. माझं लक्ष्य हेच होतं की, मला संघाच्या विजयात शक्य होईल ते योगदान द्यायचं आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com