Manisha Kayande News : मनिषा कायंदे यांची आमदारकी रद्द होणार? उज्ज्वल निकम यांनी सगळं उलगडून सांगितलं

Politcal News : मी शिवसेनेतच आहे. मी शिवसेना सोडलेली नाही, असा युक्तिवाद त्या करू शकतात.
Manisha Kayande Joins Shiv Sena
Manisha Kayande Joins Shiv SenaSaam Tv
Published On

Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांनी 18 जून रोजी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मनिषा कायंदे यांना ठाकरे गटाने विधानपरिषदेचं सदस्यत्व दिलं आहे.

मग त्यांची सदस्यत्व शिंदे गटात प्रवेश केल्यांनतर कायम राहिल का? तसं न झाल्या कायंदे यांची आमदारकी अपात्र ठरवली जाणारा का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या सर्व घडामोडींवर कायदेतज्न उज्वल निकम यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शिवसेना हा अधिकृत पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी आपण शिंदे गटामध्ये प्रवेश करीत आहोत, असं जाहीर केलं आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी अपात्र मानली जात नाही. (Maharashtra Political News)

Manisha Kayande Joins Shiv Sena
Manisha Kayande News: 'मी शिवसेनेतच...'; मनीषा कायंदेंनी सांगितलं ठाकरेंची साथ सोडण्याचं कारण

मी शिवसेनेतच आहे. मी शिवसेना सोडलेली नाही, असा युक्तिवाद त्या करू शकतात. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार मनिषा कायंदे अपात्र होऊ शकतात किंवा नाही याचा निर्णय विधानपरिषदेच्या सभापतींना घ्यावा लागेल, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं.

विधान परिषदेत सध्या ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ समसमान आहे. सध्या विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे आहे. परंतु त्यावर आता राष्ट्रवादीने जर दावा केला तर याचा गुंताही विधानपरिषदेच्या सभापतींना सोडवावा लागेल. (Latest Marathi News)

Manisha Kayande Joins Shiv Sena
Devendra Fadanvis News: उद्धव ठाकरेच महाराष्ट्रातले खरे गद्दार, फडणवीसांचा हल्लाबोल; म्हणाले, 'तुम्हाला गद्दार...'

अर्थात यासाठी विधानपरिषदेचे सभापती कोणता मार्ग निवडतात, कुठली पद्धत अवलंबतात हे पाहावं लागेल. विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदासाठी अधिकचं संख्याबळ कोणाकडे आहे? याचाही निर्णय सभापतींना घ्यावा लागेल, असं उज्ज्व निकम यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com