11th Student Dies After Cardiac Arrest Saam Tv
देश विदेश

Madhya Pradesh News: डॉक्टर होण्याचं स्वप्न राहिलं अपूर्ण! ११ वीच्या विद्यार्थिनीचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू

11th Student Dies After Cardiac Arrest: इंदूरमध्ये राहणारी यशस्वी बुरहानपूर येथे शिक्षण घेत होती. यशस्वीच्या पालकांनी बोर्डिंग स्कूल प्रशासन आणि रुग्णालयावर उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. पण बोर्डिंग स्कूल प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Priya More

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बुरहानपूरमध्ये ११ वीच्या विद्यार्थिनीचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही विद्यार्थिनी बायोलॉजीचे शिक्षण घेत होती. यशस्वी ब्राम्हणे असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. इंदूरमध्ये राहणारी यशस्वी बुरहानपूर येथे शिक्षण घेत होती. यशस्वीच्या पालकांनी बोर्डिंग स्कूल प्रशासन आणि रुग्णालयावर उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. पण बोर्डिंग स्कूल प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यशस्वी ब्राम्हणे (१७ वर्षे) या ११ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडली. तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान कार्डियाक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाला. यशस्वीच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. यशस्वीचे वडील लोहारसिंग ब्राम्हणे यांनी बोर्डिंग स्कूल प्रशासन आणि रुग्णालयावर गंभीर आरोप केलेत. बोर्डिंग स्कूल प्रशासनाने यशस्वी आजारी असल्याची कोणतीच माहिती आम्हाला दिली नाही. बोर्डिंग स्कूल प्रशासनाच्या आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच यशस्वीचा जीव गेल्याचा आरोप त्यांनी केला. पण बोर्डिंग स्कूल प्रशासनाने सांगितले की, 'आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत यशस्वीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.'

यशस्वी बोर्डिंग स्कूल परिसरातील हॉस्टेलमध्ये राहत होती. लालबाग पोलिसांनी बुधवारी जिल्हा रुग्णालयात यशस्वीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून घेतले. पोलिस सध्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. सध्या याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. यशस्वी बुरहानपूरमधील मॅक्रो व्हिजन अकॅडमीमध्ये शिक्षण घेत होती. यशस्वीचे वडील लोहारसिंह ब्राह्मणे झाबुआच्या पीजी कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.

लोहारसिंह ब्राह्मणे यांनी सांगितले की, 'यशस्वीला डॉक्टर व्हायचे होते. म्हणून आम्ही तिला नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी २८ मार्चला बुरहानपूर येते मॅक्रो व्हिजन अॅकॅडमीमध्ये दाखल केले. आम्हाला डॉक्टरांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले होते की, तिचा रक्तदाब कमी होत आहे आणि तिला अँजिओग्राफीची गरज आहे. थोड्याच वेळात त्यांनी यशस्वीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आणि आम्हाला बुरहानपूरला यायला सांगितले.'

लोहारसिंह ब्राह्मणे यांनी पुढे असे देखील सांगितले की, शाळा प्रशासनाने आम्हाला तिची तब्येत बिघडली आहे आणि ती काही दिवसांपासून शाळेत येत नसल्याचे कधीच सांगितले नाही. यशस्वी खूप स्ट्राँग होती. तिला अशक्तपणा किंवा कोणताही आजार नव्हता.' तसंच, आम्हाला संशय आहे की डॉक्टरांनी तिला औषधाचा ओव्हर डोस दिला असावा किंवा तिच्यावर योग्य उपचार केले नाहीत. त्यामुळेच तिचा मृत्यू झाला.', असा आरोप त्यांनी केला आहे.

तसंच, यशस्वीची प्रकती ठिक नसेल तर डॉक्टर तुम्हाला फोन करतील, असे शाळा प्रशासनाने सांगितले. ती ठिक आहे आणि आम्हाला येण्याची गरज नाही असे ते वारंवार सांगित राहिले. मी जिल्हा प्रशासनाकडे विनंती करतो की, बोर्डिंग स्कूलचे संचालक आनंद चौकसे यांच्याविरोधात कारवाई करा.', अशी मागणी यशस्वीच्या वडिलांनी केली आहे.

बोर्डिंग स्कूल प्रशासनाने आरोप फेटाळून लावले. आनंद चौकसेंनी सांगितले की, 'दुपारी 4 च्या सुमारास यशस्वीने छातीत दुखत असल्याची तक्रार केली आणि वॉर्डनने तिला अपघातग्रस्त वॉर्डमध्ये नेले. ईसीजी केल्यानंतर तिला कार्डियाक अरेस्ट आल्याचे समजले. आमच्याकडे तिच्या संभाषणाचा, कुटुंबाशी झालेला संवाद आणि यशस्वीचे सीसीटीव्ही फुटेज यांचे मिनिट मिनिट तपशील आहेत.'

यशस्वीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, 'तिला पाच दिवसांपासून ताप होता. तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचे हृदय फक्त 30- 35 टक्के पंपिंग करत असल्याचा पुरावा आमच्याकडे आहे. यशस्वीला आयसीयूमध्ये हलवल्यानंतर तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ती बेशुद्ध पडली. आम्ही रात्री 8 च्या सुमारास सीपीआर सुरू केला आणि रात्री साडे अकरा वाजेपर्यंत चालू ठेवला पण तिला वाचवता आले नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीवर सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

सकाळी सकाळी शरीरात दिसणारे 'हे' बदल सांगतात किडनी फेल होतेय

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

SCROLL FOR NEXT