सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी वकिलांना एक खास गिफ्ट दिलं आहे. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान सेवांच्या मदतीने व्हाट्सअॅप सेवा सुरू करण्याची घोषणा केली. त्यामुळे खटला दाखल करण्यापासूनची इतर सर्व माहिती प्रकरणाची तारीख, मेंशनिग वकिलांना त्यांच्या व्हाट्सअॅपवर मिळणार आहे.
नव्या सेवेची घोषणा करताना सीजेआय म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या ७५ वर्षात न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी नवी संपल्पना सुरू केली आहे. आता व्हॉट्सअॅप ला आयसीटी सेवासोबत जोडलं जात आहे. यावर वकिलांच्या केसेस कोर्टात दाखल होणारी माहिती त्यांच्या मोबाईलवर व्हाट्सअॅपवर उपलब्ध होईल. त्याचसोबत बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांना कॉजलिस्ट प्रकाशित झाल्याची सूचना मिळणारआहे.
यामुळे न्यायपालिकेच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदलाव होईल आणि कागदाचा उपयोगही कमी होईल. विशेष म्हणजे जास्तीत जास्त वकिलांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचता येणार आहे. याचा महत्त्वपूर्ण फायदा असा होईल की दर्गमभागातील लोकांपर्यंत न्यायालयासंदर्भातील माहिती मिळू शकणार आहे.
बनवण्यात आला आहे. त्या बनवण्यात आलेल्या न्यायालयाच्या सर्व सेवांना मेघराज क्लाउड २.० मध्ये ट्रान्सफर करण्यात येत आहे, जो नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरद्वारे (NIC) बनवलेला क्लाउड इन्फ्रा आहे. तसंच सर्वोच्च न्यायालय आणि ई-कोर्ट प्रणालीलाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे सर्व न्यायालये ऑनलाईन होणार आहेत. सुरुवातीला अडचणी होत्या मात्र आता भातातच सर्व्हरवर डेटा सुरक्षित ठेवता येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.