दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्यावरून राजकारण तापलं असतानाचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिल्लीत दुप्पट बिअरच्या बोटल जप्त करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षी मार्च महिन्यात ५, ९६५ बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या तर गेल्या वर्षी हा आकडा २,११७ होता, टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत देशी दारूची तस्करीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वर्षी देशी दारूच्या 1,23,479 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत, तर गेल्या वर्षी 1,17,998 बाटल्या करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकांमुळे त्यांनी शहरात सुरक्षा आणि सुरक्षेच्या उपाययोजना वाढवल्या आहेत. गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच दारूच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
या वर्षी उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत 1,382 प्रकरणे नोंदवण्यात आली. यापैकी पोलिसांनी 1,363 प्रकरणांची उकल केली असून 1,400 हून अधिक दारू तस्करांना अटक केली आहे. या वर्षी पोलिसांना भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या (IMFL) बाटल्या 3,669 सापडल्या आहेत.
अवैध दारूचा पुरवठा करण्यामागे एझी मनी कारण असल्याचं पोलिसांनी सांगितले. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची पथके आणि गस्त वाढवण्यात आली आहे, त्यामुळे कारवाई करणं सोपं झालं आहे. बहुतेक दारूसाठा इतर राज्यातील होता. शेजारील राज्यातून अनधिकृतरित्या या दारूची मोठ्या नफ्यासाठी दिल्लीत विक्री सुरू होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि हरियाणा-दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा व्यापार आणि वाहतूक सुरू असते. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावर आळा घालण्यासाठी मोठी मोहीम सुरू करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.