Arvind Kejariwal: अरविंद केजरीवाल तपासत सहकार्य करत नाहीत, ईडीची सुप्रीम कोर्टाकडे तक्रार

Delhi Liquor Scam: ईडीने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) तक्रार दाखल केली आहे. अरविंद केजरीवाल तपासला सहकार्य करत नसल्याचा आरोप करत यासंदर्भात ईडीने तक्रार दाखल केली आहे.
Delhi Liquor Case
CM Arvind KejariwalSaam Tv
Published On

दिल्ली दारू घोटाळ्याशी (Delhi Liquor Scam) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अटकेत आहेत. ईडीने अरविंद केजरीवाल यांना अटक केली असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. अशामध्ये ईडीने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) तक्रार दाखल केली आहे. अरविंद केजरीवाल तपासला सहकार्य करत नसल्याचा आरोप करत यासंदर्भात ईडीने तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत सुप्रीम कोर्टात तक्रार दाखल केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी तपासादरम्यान आपल्या मोबाईलचा पासवर्ड सांगायला नकार दिला असून ते तपासला सहकार्य करत नाहीत. तपासात टाळाटाळ करणारी उत्तरं केजरीवाल देत आहेत. त्यामुळं तपास करताना अडचणी येत आहेत, अशी तक्रार ईडीने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. ईडीने प्रतिज्ञाप्राद्वारे सुप्रीम कोर्टाला ही माहिती दिली आहे.

Delhi Liquor Case
PM Modi: पंतप्रधान मोदींच्या 'त्या' विधानाची निवडणूक आयोगाकडून दखल, काँग्रेसने केली होती कारवाईची मागणी

काही दिवसांपूर्वी ईडीने कोर्टात खळबळजनक दावा केला होता. 'अरविंद केजरीवाल यांना मधुमेह असतानाही ते जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात आहेत. त्यामुळे वैद्यकीय कारण पुढे करून ते जामीन मागू शकतात', असा दाव ईडीने कोर्टामध्ये केला आहे. ED च्या दाव्यानंतर कोर्टाने तिहार जेल प्रशासनाकडून केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला होता. अरविंद केजरीवाल यांना मधुमेह असल्याने त्यांनी गोड खाऊ नये हे सांगितले होते. पण तरीही केजरीवाल यांना त्यांच्या घरून डबा येतो त्यात आंबे, मिठाई असते. हे गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेह वाढू शकतो. याचा फायदा घेऊन ते मेडिकलचं कारण देऊन जामीन मागू शकतात, असे ईडीने म्हटले होते.

Delhi Liquor Case
Patna Fire : पटनामध्ये अग्नितांडव! रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग; 6 जणांचा मृत्यू, मदतकार्य सुरु

दरम्यान, दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि बीआरएस नेत्या के. कविता २३ एप्रिलच्या सुनावणीदरम्यान दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मोठा झटका दिला. अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये ७ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कोर्टाने व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे ही सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान ईडीने कोर्टाला लवकरच के. कविता प्रकरणाचे आरोपपत्र सादर करु असे सांगितले होते.

Delhi Liquor Case
Manish Kashyap: प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपचा भाजप प्रवेश; प्रवेशामागची PM मोदींशी संबंधित स्टोरी सांगितली!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com