PM Modi: पंतप्रधान मोदींच्या 'त्या' विधानाची निवडणूक आयोगाकडून दखल, काँग्रेसने केली होती कारवाईची मागणी

Rajasthan Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. त्यांनी बांसवाडा येथे केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू आहे.
PM Modi
PM ModiSaam Tv

प्रमोद जगताप साम टिव्ही, नवी दिल्ली

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील वातावरण तापलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी राजस्थानमध्ये केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. त्यांनी बांसवाडा येथे केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून (Election Commission) चौकशी सुरू आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या मालमत्तेचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधान केलं होतं. याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

'देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे', माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या या विधानाचाही दाखला पंतप्रधान मोदींनी सभेत बोलताना दिला होता. पंतप्रधानांच्या या विधानाविरोधात ( PM Narendra Modi Speech In Rajasthan) काँग्रेस आणि माकपने निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

काँग्रेस आणि माकपने (Sabha Election 2024) पंतप्रधान मोदींच्या विधानावर कारवाई करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. आयोगाने आता या दोन्ही तक्रारींची दखल घेतली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाची चौकशी सुरू केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर लोकांच्या मालमत्तेचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल, असं पंतप्रधान मोदी राजस्थानमधील बांसवाडा येथे पार पडलेल्या सभेत (Rajasthan Lok Sabha Election 2024) म्हणाले होते.

PM Modi
Vijay Wadettiwar: देशात भाजपविरोधी वातावरण; PM मोदींच्या सभेला जबरदस्तीने आणलेली माणसं.. विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

काँग्रेस आणि माकपने पंतप्रधानांच्या (PM Modi News) या विधानाविरोधात निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. पंतप्रधानांनी केलेलं हे विधान फूट पाडणारे आहे. ते विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत असल्याचं काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटलं (Rajasthan Lok Sabha) आहे. राजस्थानमध्ये प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा संदर्भ देत काँग्रेस सर्व संपत्ती मुस्लिम समाजाला देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.

PM Modi
Jamie Dimon News: PM नरेंद्र मोदींच्या काळात भारतात अविस्मरणीय काम; जेपी मॉर्गनच्या सीईओंकडून पंतप्रधानांची स्तुती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com