Vijay Wadettiwar: देशात भाजपविरोधी वातावरण; PM मोदींच्या सभेला जबरदस्तीने आणलेली माणसं.. विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

Maharashtra Loksabha Election: देशातील वातावरण हे भाजपविरोधी आहे, जुमलेबाज सरकार असल्याचे लोकांना पटलेले आहे, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSaam TV

पराग ढोबळे, नागपूर|ता. २४ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. लोकसभेच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले असून राज्यात त्यांच्या प्रचासभांचा धडाका सुरू आहे. एकीकडे प्रचारसभांमधून भाजप नेते ४०० पार चा नारा देत असतानाच देशातील वातावरण हे भाजपविरोधी आहे, जुमलेबाज सरकार असल्याचे लोकांना पटलेले आहे, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

"या देशातील वातावरण हे भाजपविरोधी आहे, जुमलेबाज सरकार असल्याचा लोकांना आता पटलेला आहे. जबरदस्तीने आणलेले माणसांना टाळ्या वाजवतात ना रिस्पॉन्स देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्रुवीकरणाचे भाषण करत आहे आणि यावर निवडणूक आयोग निष्पक्ष काम करतो का?" असा सवाल उपस्थित करत विजय वडेट्वीवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

"पेट्रोल डिजेल, डाळ साखर, गव्हाचे भाव कमी झालेले नाही. बिना खिशाचे शर्ट घालावे लागेल अशी परिस्थिती गरिबाची झालेली आहे. कितीही रणनीती बदलू दे, काँग्रेसवर आरोप करू दे लोकांनी आता ठरवलेलं आहे. हे खोटारडे बोलणार सरकार आहे. लोकांना मूर्ख समजून भाषण केली जात आहेत," असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

Vijay Wadettiwar
Maharashtra Election: पंतप्रधान मोदींचा मास्टर प्लान, महाराष्ट्रात ३ दिवसांत ७ सभा घेणार; महायुतीची ताकद वाढणार?

"या देशात सर्वात लोकप्रिय माणूस जर कोणी असेल तर तो पार्थ पवार असेल. देशात कुठेही गेला तरी त्यांच्या भोवती लाखोच्या संख्येने गर्दी होते. अशा नेत्याला वाय प्लस सुरक्षा देणे म्हणजे त्यांचा अपमान आहे. त्याला सेंट्रल गव्हर्मेंटचे सुरक्षा कवच देण्याची गरज आहे. या तरुणाकडे जग आशेन बघत आहे. हा पार्थ पवार उद्या जगाचा नेता होणार आहे. त्याची सुरक्षा करणे हे सरकारचे काम असल्याची खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar
Aaditya Thackeray : हा निवडणूक आयोग आहे की भाजप आयोग हे समजत नाही; आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com