Floodwaters inundate residential areas in Rajouri district as vehicles are swept away following heavy rainfall in Jammu & Kashmir. saam tv
देश विदेश

भारताच्या नंदनवनात मुसळधार पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता, गाड्या वाहून गेल्या

Heavy Rainfall Flood Situation In Jammu Kashmir Rajouri Poonch: जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांत 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. बचावकार्य सुरू असून हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी आणि रविवार दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली. दरहाली नदीची पाण्याची पातळी वाढल्याने जिल्ह्यातील खालच्या भागांमध्ये पाणी शिरले. विविध घटनांमध्ये सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला असून अजुनही काही जण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यांचा शोध सुरू आहे. या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, राजौरीतील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. तसेच अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट तहसीलमध्ये सर्वाधिक हानी झाली असून बहुतांश मृत्यू येथेच नोंदवले गेले आहेत. सततचा पाऊस आणि खराब झालेल्या रस्त्यांमुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. तरीही बचाव पथके बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे राजौरीमध्ये भूस्सखलनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार पाच जण अजुनही बेपत्ता आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून या भागात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरहाली, खंडली सूक्तोह आणि जमोल या नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरहाली नदीचे पाणी भिंत फोडून बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये शिरल्याने अनेक वाहने वाहून गेली. पूरग्रस्त भागांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, अब्दुल्ला ब्रिजखालून सुमारे 50 कुटुंबांचे रेस्क्यू करण्यात आले आहे. तारिक ब्रिज परिसरातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमची पथके प्रत्येक SOS कॉलला प्रतिसाद देत आहेत. सध्या जीवितहानी टाळणे हे आमचे प्राधान्य आहे. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले असले, तरी पाणी ओसरल्यानंतरच अचूक नुकसानाचा अंदाज येऊ शकेल. दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर माता वैष्णो देवी आणि बाबा अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. श्रीनगर, राजौरी आणि पुंछसह अनेक भागांत अजूनही पाऊस सुरू असून, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीत विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व एल्गार, सीजेपीचं आंदोलन, थेट संसदेवर धडक

संसदेच्या आत आणि बाहेर सरकारची कोंडी, विरोधकांनी घेरलं, संसदेचं कामकाज रखडलं

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरूच राहणार; जो पर्यंत... हॉस्पिटलमधून लिहिलेल्या पत्राद्वारे केली मोठी मागणी

हरिश्चंद्रगडावर भीषण दुर्घटना! दरड कोसळली, मुंबईचे २ ट्रेकर्स मातीखाली गाडले गेले

SCROLL FOR NEXT