

मेरठ रुग्णालयातील नर्सची हत्या
बॉयफ्रेंडने विषारी इंजेक्शन देऊन केली हत्या
ऑपरेशन थिएटरमध्ये आढळला मृतदेह
याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका खासगी रुग्णालयात नर्सचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने आणि त्याच्या साथीदारांनी या नर्सची हत्या केली. लग्नासाठी दबाव टाकत असल्याच्या रागातून या नर्सच्या बॉयफ्रेंडने तिची हत्या केली. रुग्णालयच्या ऑपरेशन थिएटरमध्ये विषारी इंजेक्शन देत तिचा जीव घेतला. ही आत्महत्या आहे असे वाटावे म्हणून आरोपींनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा (२५ वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव होते. ती फाफुंडा येथे राहत होती. लोहिया नगर येथील एमसीसी रुग्णालयात ती नर्स म्हणून कार्यरत होती. शनिवारी सकाळी ती तिच्या नणंदेसोबत कामावर गेली होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ती रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना नेहाचा मृतदेह आढळला त्याठिकाणी सल्फरच्या गोळ्या आणि सासरच्या मंडळींवर आरोप करणारी एक सुसाईड नोट सापडली. नेहाच्या कुटुंबीयांना तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटवरील हस्ताक्षरावर शंका आली आणि त्यांनी हत्येचा संशय व्यक्त केला. त्यांनी पोलिसांना नेहाचे जुने हस्ताक्षरही दाखवले आणि तिच्या सासरच्या मंडळींशी कोणताही वाद नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला.
तपासादरम्यान, पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल डिटेल्स तपासले. त्यावेळी जे दिसलं ते पाहून पोलिस चक्रावले. सीसीटीव्हीमध्ये नेहा, सुरेश आणि फरहान ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना दिसले. थोड्या वेळाने हँडग्लोव्हज घातलेला सुरेश बाहेर येताना दिसला. आरोपी सुरेश विवाहित असून त्याला ५ वर्षांचा मुलगा आहे. सरेश आणि नेहा गेल्या ७-८ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. नेहा त्यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे त्याने तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गु्न्हा दाखल केला असून त्यांना अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.