Nanded Crime: नांदेडच्या तिहेरी आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, शिक्षकानेच आधी मुलांची हत्या करून संपवलं जीवन

Nanded Police: शिक्षकाने दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केली. हत्येनंतर मुलांचे मृतदेह कारमध्ये भरून ती कार थेट नदीमध्ये घातली. या हत्याकांड आणि आत्महत्येचा तपास पोलिस करत आहेत.
Nanded Crime: नांदेडच्या तिहेरी आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, शिक्षकानेच आधी मुलांची हत्या करून संपवलं जीवन
Nanded Crime:Saam Tv
Published On
  • नांदेडमधील तिहेरी मृत्यू प्रकरणाला तपासादरम्यान धक्कादायक वळण

  • शवविच्छेदन अहवालानुसार शिक्षकाने आधी दोन मुलांची हत्या केल्याचे उघड झाले

  • आत्महत्येपूर्वी शिक्षकाने वरिष्ठांवर आरोप करणारे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होत

  • या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेडमध्ये एका शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह कार गोदावरी नदीत घालून जीवनयात्रा संपवली होती. ही तिहेरी आत्महत्या होती अशी चर्चा सुरू होती. पण या प्रकरणाच्या तपासातून ही सामूहिक आत्महत्या नसून शिक्षकाने आधी आपल्या दोन मुलांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह कारमध्ये ठेवून नंतर कार थेट नदीत घालून आत्महत्या केली. या हत्याकांड आणि आत्महत्या प्रकरणामुळे नांदेड हादरले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसही चक्रावले.

रिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून शिक्षक सुनील मोरेने कीर नदीत घातली होती. मात्र कार नदीत घालण्यापूर्वीच त्याने आपल्या दोन्ही मुलांची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे उघड झाले. छातीत आणि पोटात चाकू मारून दोन्ही मुलांची हत्या करण्यात आल्याचे शवाविछेदन अहवालातून स्पष्ट झाले. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या ४२ वर्षीय सुनील मोरे या शिक्षकाने शुक्रवारी १६ जुलै रोजी सकाळी आपल्या दोन मुलांसह कार नदीत घातली घातल आत्महत्या केली होती.

नांदेड - मूदखेड मार्गावरील आमदूरा पुलावरून भरधाव वेगाने त्याने गोदावरी नदीत कार घातली होती. त्या कारमध्ये त्याची १४ वर्षीय मुलगी सारा आणि 10 वर्षीय मुलगा सुमेध हे दोघे पण होते. गट शिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी शिक्षक दत्ता पवळे यांच्या त्रासाला कंटाळून मुलांसह आत्महत्या करत असल्याच स्टेटस त्याने व्हाट्सअपवर ठेवले होते. शिवाय तसा एक मॅसेज देखील मयत सुनील मोरे याने मित्रांच्या ग्रुपवर टाकला होता.

सुनील मोरे याच्या मृत्यू प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी ४ जणांवर ॲट्रॉसिटी आणि मरनास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला . दरम्यान आपल्या दोन्ही मुलांसह त्याने गाडी नदीत घातली अस प्रथमदर्शनी वाटत होतं. मात्र या निर्दयी पित्याने कार नदीत घालण्यापूर्वीच आपल्या दोन्ही मुलांची हत्या केली. चाकूने मुलगी सारा आणि मुलगा सुमेध यांच्या छातीवर आणि पोटात वार करून त्यांना संपवलं. हत्या केली. नंतर दोन्ही मुलांच्या मृतदेहासह कार नदीत घालुन आयुष्य संपवलं. तिघांच्या मृतदेहाचे शवविच्छेन करण्यात आले तेव्हा या हत्याकंडाचा उलगडा झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com