खासदार भास्कर भगरे यांच्या घरी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक संघर्षाचा देखावा,पल्लवी भगरे यांनी साकारला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित देखावा...
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिकेतील दुर्गा देशमुखची भूमिका साकारणारी बालकलाकार गार्गी आहेरची देखाव्याला भेट.गार्गी आहेरने गणरायाची आरती करत घेतले सावित्रीबाई फुले यांच्या देखाव्याचे दर्शन...
भिवंडी शहर व ग्रामीण भागात मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. अवघ्या अर्धा तासाचा पावसामध्ये भिवंडी शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची घटना घडली आहे. शहरातील भाजी मार्केट परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले होते.
मोठ्या प्रतीक्षेनंतर अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी
तब्बल तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच जोरदार पावसाला सुरुवात
जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान
अनेक ठिकाणी पिके करपून चालली, पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न
असाच पाऊस कायम राहिल्यास शेतकरी आणि जनावरांना मोठा दिलासा मिळणार
ठाणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात....
वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु....
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ....
सखल भागात पाणी साचायला सुरुवात...
गेल्या अर्धा तासांपासून ५.३३ मिलिमीटर पावसाची नोंद...
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न,जालना पोलीस दलात खळबळ...
जाफराबाद पोलीस ठाण्यातील ASI अर्थात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाकडून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
जनार्दन भापकर असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव...
कर्जत खोपोलीमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. जागोजागी पाणी साचले सोसायटीमध्ये देखील पाणी साचलेले दिसून येत आहे. तर शाळेमधील सर्व लहान मुले पाण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत
ठाण्यातील प्रसिद्ध उपवन तलाव परिसरात मध्यरात्री काही तरुणांचा धिंगाणा पाहायला मिळाला आहे.
कार सुरू असताना एक तरुण चक्क कारच्या बोनटवर बसून जीवघेणा स्टंट करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
राज्यातील SIR प्रक्रियेत २ कोटी ६ लाख नावं वगळण्यात आले आहेत. त्यामुळं नाव नोंदणी आणि दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्याची जोरदार मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. याच मुद्द्याच्या अनुषंगाने
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे शिष्टमंडळ उद्या सकाळी साडेअकरा वाजता मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यां
कुलदैवत खंडेरायाची नगरी असलेल्या जेजुरीत हरीश्चंद्रे परिवाराच्या वाड्यात एक दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती पिढ्यान्पिढ्या पूजली जात आहे. ढोकरा आदिवासी धातुकला परंपरेतील ही मूर्ती असून, तिचा काळ सुमारे दहावे किंवा अकरावे शतक असावा, असा अंदाज स्थानिक इतिहास अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात गणपती विसर्जन मिरवणुकांना आता सुरुवात झाली आहे या मिरवणुकीत काही गणपती मंडळ डीजे आणि डॉल्बी वापरून सर्रास पोलिसांच्या डोळ्यादेखत ध्वनी प्रदूषण करत आहेत.
: कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगावजवळ पुणे-बंगळूर महामार्गावर धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. कारमध्ये चालक एकटाच होता. कारला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने कारमधून बाहेर पडला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावर काही काळ बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दोन दिवसापूर्वी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली. यानंतर आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला यावेळी हजारो शेतकरी -नागरिक विविध समस्या घेऊन चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन घेऊन आले आहेत.. सध्या अमरावती जिल्ह्यात दुष्काळ स्थिती असल्याने शेती प्रश्नांना घेऊन मंत्री बावनकुळे यांच्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत..
IIT बॉम्बे विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाली असतांना युवक काँग्रेसकडून आंदोलनाला सुरुवात
पवई IIT च्या गेटवर युवक काँग्रेसकडून आंदोलन
विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक
तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील स्मशानभूमीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने ‘अग्नी तांडव’ आंदोलन केले. सरणावर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांसाठी तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शासनाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
कामावर आल्यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना छातीत दुखलं आणि चक्कर आली त्यांनतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केल मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला
पोलीस उपनिरीक्षक विजय सागंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्ट पथकात होते कार्यरत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होते
डोंबिवलीच्या पलावा सिटी मध्ये आपल्या कुटुंब सोबत राहत होते
त्यांच पार्थिव आता मूळ गावी नेण्यात येणार आहे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हिंगोलीतील दुष्काळग्रस्त शेतांची पाहणी केली. कळमनुरी तालुक्यातील कळमकोंडा गावातील शेतकरी शिवाजी वैद्य यांच्या शेतात गुरे सोडल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी रोहित पवार यांनी कृषिमंत्री आणि सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला.
गौरी-गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे.
मात्र, ठाण्यात ध्वनिप्रदूषणाची समस्या अद्याप कायम असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. विविध ठिकाणी ध्वनीपातळी १०० ते १०५ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे आढळले. डीजेला पर्याय म्हणून मोठे ड्रम, ढोल-ताशा, बॅन्जो आणि ध्वनिवर्धकांचा वापर वाढल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश बेडेकर यांनी नमूद केले.
सातारा जिल्हा पोलीस दलाच्या K9 श्वान पथकातील ट्रॅकर श्वान ‘रिओ’चे प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. मार्च २०१६ मध्ये पोलीस दलात दाखल झालेल्या रिओने १० वर्षांच्या सेवेत अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मोलाची मदत केली.
तुळजापूर तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या आक्रोश मोर्चादरम्यान एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील शेतकरी कृष्णा गुंड यांनी सोलार कंपनीने रस्ता अडवल्याच्या मुद्द्यावरून हे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी कृष्णा गुंड यांना ताब्यात घेतले असून, या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
डिजिटल पेमेंटवर आकारण्यात येणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळण्याची मागणी CIPDने केली आहे. यासंदर्भात CIPDकडून केंद्र सरकारसह पेट्रोलियम कंपन्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देताना पेट्रोलपंपांवर येणारा अतिरिक्त शुल्काचा भार कमी करणे गरजेचे असल्याचे CIPDने म्हटले आहे. सरकार आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करेल, असा विश्वास CIPDचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आज नांदेड दौऱ्यावर होते. नांदेड शहराजवळील तळणी आणि एकदरा येथे त्यांनी शेतीपिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असून २८० तालुक्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. पाच ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करण्यासाठी थांबण्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. परतीचा पाऊस झाल्यास पिके हिरवी दिसतील आणि सॅटेलाइट छायाचित्रांमधून काही शेती दुष्काळाच्या निकषातून वगळली जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पुण्यात रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अश्या आशयाचे बॅनर लागले , कार्यकर्ते प्रेमापोटी आणि नेत्याला चांगल वाटावं म्हणून असे बॅनर लावत असतील पण हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.
आम्ही विरोधात आहोत , लोकांमध्ये जाऊन आम्ही लोकांच्या अडचणी सोडण्याच आम्ही काम करत आहोत .. एकाद्या कार्यकर्त्याने बॅनर लावला तर त्याची इतकी चर्चा होणे योग्य नाही.आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी दुष्काळ लवकर जाहीर करावा, शेतकऱ्यांना मदत करावी, शेतकऱ्यांची मुलं जी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्या अडचणी सोडवाव्यात , लाडक्या बहीण योजनेतून महिलांची नावं कमी केलीत ती परत घ्या अस रोहित पवार म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गट्टा पोलिसांनी जांभळीझोरा येथे छापेमारी करत २२ लाख ५० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये १०३ चुंगळ्यांमध्ये साठवून ठेवलेला सुगंधित तंबाखू आणि एका स्कॉर्पिओ वाहनाचा समावेश आहे. या प्रकरणी अजीत कुजूर, साईनाथ कन्नाके, सचिन कन्नाके आणि अभिजित नान्हे यांना पोलिसांनी अटक केली असून, मुख्य आरोपी प्रशांत याडवार फरार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेले लाखो गणेशभक्त आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. गौरी-गणपती आणि सात दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर आज मोठ्या संख्येने गणेशभक्त मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. रेल्वेच्या १२ गाड्या मुंबईकडे रवाना होत असून, एसटीच्या दीडशे बसेसही प्रवाशांच्या सेवेत दाखल आहेत.
गणेशोत्सवानिमित्त जवळपास ४ ते ५ लाख मुंबईकर कोकणात दाखल झाले होते. आता बाप्पांना निरोप देऊन सुरू झालेल्या या परतीच्या प्रवासाचा कुडाळ रेल्वे स्थानकातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी.
महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, काही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्जमाफीप्रमाणेच दुष्काळग्रस्त परिस्थितीत आवश्यक उपाययोजनांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. NDRFच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून आवश्यक पावले उचलली जातील, असेही तटकरे यांनी सांगितले.
मिरा-भाईंदरमध्ये 500 रुपयांच्या नोटा केमिकलमध्ये टाकून त्यापासून तिप्पट नोटा तयार करता येतात, असे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा काशिगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी अमोल वसंत बंडगर (43), चैत्राली शंकर चक्रबोर्ती (27) आणि निशा सुनील मोरे (41) या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 1 लाख 38 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काजूपाडा येथील गोल्डन रिट्रीट हॉटेल परिसरात आरोपी नागरिकांना नोटांची संख्या वाढवून देण्याचे आमिष दाखवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून 500 रुपयांच्या नोटा, केमिकलच्या बाटल्या, काळ्या रंगाने रंगवलेल्या नोटा, प्लास्टिक पॅकेट, नोटा वाळवण्यासाठीचे साहित्य, सहा मोबाईल फोन आणि दोन बॅग जप्त करण्यात आल्या.
याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 62 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
शहापूर -
शहापूर बसचा भीषण अपघात
बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात
8 ते 10 प्रवासी जखमी
जळगाव -
विमा कंपनीच्या कार्यालयांत तक्रारी पडून
केळी उत्पादकांच्या तक्रारींवर कार्यवाही नाही; विमा संरक्षित क्षेत्र कमी केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेअंतर्गत केंद्र सरकार पुरस्कृत भारतीय कृषक विमा कंपनीची (एआयसी) नियुक्ती शासनाने केली आहे. मात्र, या कंपनीकडे फळ पीकविमा योजनेतील विमाधारक केळी उत्पादकांच्या अनेक तक्रारी प्रलंबित आहेत.
सातारा -
पाटेघरमध्ये गणपती विसर्जनाला वादाचे गालबोट
पाणंद रस्त्याच्या वादातून कुटुंबावर सामाजिक बहिष्काराचा आरोप
प्रसाद वाटपा दरम्यान दोन गटात धक्काबुक्की करत उफाळला वाद
दोन वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाची किनार
दोन्ही गटांना उद्या सोमवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश
रत्नागिरी - गणपती विसर्जनानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू
परतीच्या प्रवासासाठी एसटीला कोकणवासीयांची पसंती
रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या प्रवासासाठी जवळपास अडीच हजार एसटी बसचे बुकिंग
लांजा आगारातून तब्बल १०३ एसटी बसचे बुकिंग
ग्रामीण भागातूनही गावागावातून एसटीला प्रवाशांची पसंती
एसटी स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने एसटी बस परतीच्या प्रवासासाठी सज्ज
प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष नियोजन
सुरक्षित आणि विश्वासार्ह एसटी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
जालना -
अंबडमध्ये पहाटेच्या सुमारास दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक
दुकानात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर...
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आटोक्यात आणली आग
रत्नागिरी - राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी
गणपती स्पेशल गाड्यांसह नियमित धावणाऱ्या गाड्या देखील उशिरा
यंदा देखील लाखो कोकणवासीयांना परतीच्या प्रवासासाठी करावी लागतेय कसरत
ग्रामीण भागातून येणारा प्रवाशांना वाहतुकीचे पर्याय किंवा कोकण रेल्वेचे पर्याय आणि संख्या कमी असल्यामुळे होतात हाल
जादा गाड्या सोडल्यानंतर देखील तिकीट कन्फर्म मिळण्यासाठी अनंत अडचणी
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, राजापूर आडवली, विलवडे, संगमेश्वर सारख्या प्रमुख स्थानकांवर होतेय गर्दी
अकोला शहरातील हरिहरपेठ भागात चांदखा प्लॉटमध्ये दोन गटात वाद.
किरकोळ वादावरून भांडणानंतर दोन्ही गटात दगडफेक.
दोन ते तीन वाहनांचे दगडफेकीत नुकसान, घटनेत कुणीही जखमी नाही.
दगडफेकीच्या घटनेनंतर हरिहरपेठ भागात मोठा पोलीस बंदोबस्त.
दोन्ही गटातील दोषी लोकांची पोलिसांकडून धरपकड सुरू.
हरिहरपेठ भागात संपूर्ण शांतता. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन.
कोल्हापूर -
अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारातील सांघिक गटात रौप्य पदक
गोकुळ साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन, 25 जागांवर भाजप अर्ज दाखल करणार
गणेश विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टिमचा सर्रास वापर, शिरोलीमध्ये दहा मंडळांवर गुन्हे, ट्रॅक्टर ट्रॉली सह साहित्य जप्त
पाचगावमध्ये विजेच्या धक्क्याने 10 बकऱ्यांचा मृत्यू, दीड लाखांचे नुकसान
रिक्षा मीटर कॅलिब्रेशन शुल्क संदर्भात आरटीओ, संघटना, एजंटांची लवकरच बैठक
पट्टणकोडोली मध्ये तीन एकर ऊसाला आग, आगीमध्ये संपूर्ण ऊस जळून खाक
अमरावती -
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर
अमरावतीमध्ये जनता दरबाराच आयोजन.
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळ परिस्थितीची पाहणी केली.
आज पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज जिल्हा दौऱ्यावर असून दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या ऐकणार आहेत आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी तात्काळ अधिकाऱ्यांना आदेश, सूचना देणार आहेत.
जनता दरबारानंतर कर्जमाफी व पीक कर्जा संदर्भात लीड बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक, महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक व शहरातील गणपती मंडळांना भेटी देणार आहेत
सोलापूर -
सोलापूर जिल्ह्यातील कोरडा दुष्काळाच्या पोस्टवरून वादाची किनार
सोलापूर भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केलेल्या पोस्टसंदर्भात दिलं स्पष्टीकरण..
पोस्ट करणं चुकीचीच मात्र त्या मागील उद्देश चांगला असल्याचं शशिकांत चव्हाण यांच मत..
विरोधकांनी कोरड्या दुष्काळावर राजकारण करू नये असाही दिला सल्ला
शशिकांत चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसापूर्वी दुष्काळ जाहीर झाला अशी केली होती पोस्ट..
शशिकांत चव्हाण यांनी पोस्ट केल्यानंतर विरोधकांकडून आंदोलन आणि जोरदार टीका करण्यात आली होती..
नाशिकच्या येवला शहरात अनेक मंडळांनी भव्य देखावे सादर केले असून देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे.
शहरातील गांधी मैदान येथील ओंकार धर्मरक्षक ग्रुपचा रेणूका माता मंडळाचा माहूरगड येथील रेणुका देवी मंदिराचा देखावा उभारला असून मंडळातर्फे सतत देवीचा जागर करण्यात येत असल्याने भाविकांचा उत्साह वाढवत आहे.
गेल्याने अनेक वर्षा पासून मंडळातर्फे नाविन्यपुर्ण देखावे सादर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.
सांगली -
जत तालुका दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सांगलीच्या जत तालुक्यातील उटगी येथील कोरड्या तलावात आरती करत थेट गणरायाला साकडे घालण्यात आले आहे.
जत तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक तलाव कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला.
त्यामुळे राज्य सरकारने तातडीने जत तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी थेट कोरड्या तलावात गणपतीची महाआरती केली आहे.
भिमाशंकर अभयारण्यात निसर्गाचा स्वर्गीय आविष्कार; धुकं, रिमझिम पाऊस अन् खळखळते धबधबे
भिमाशंकर अभयारण्यात सध्या हिरवेगार घनदाट जंगल, पांढरंशुभ्र धुकं आणि रिमझिम पावसाने निसर्गाचं मनमोहक रूप खुललं आहे.
डोंगरकड्यांवरून खळखळ वाहणारे धबधबे आणि तीन टप्प्यांत पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला कोंढवळचा धबधबा लक्ष वेधून घेतोय.
कल्याण -
टिटवाळ्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत पुढे जाण्याच्या वादातून राडा, भाजप व ठाकरे गट आमने-सामने
वादाचे रूपांतर धक्काबुक्की, मारहाण आणि गोंधळात झाले.
भाजपच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका उपेक्षा भोईर, त्यांचे पती शक्तिवान भोईर तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि पदाधिकारी प्रदीप भोईर यांच्यात मिरवणुकीत पुढे जाण्यावरून वाद झाला.
या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी चौघांसह दोन्ही गटातील 70 ते 80 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.