SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

SBI Update : SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. सप्टेंबरअखेर तीन दिवस बँक संपामुळे शनिवार- रविवारसह सलग पाच दिवस शाखा सेवा प्रभावित होऊ शकतात.
SBI Customers Alert
SBI Customers Alertmeta ai
Published On

तुम्ही बँकेशी संबंधित कोणताही व्यवहार करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सप्टेंबर २०२६ च्या अखेरीस बँका सलग पाच दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी महत्त्वाचे बँकिंग व्यवहार वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँकेने ग्राहकांना प्रस्तावित संपाच्या कालावधीआधी आवश्यक व्यवहार उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या दिवसांमध्ये तीन दिवसांच्या बँक संपाचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यापूर्वी २६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार असल्याने बँक शाखांमधील नियमित कामकाज सलग पाच दिवस प्रभावित होऊ शकते.

SBI Customers Alert
8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

महत्त्वाचे व्यवहार आधीच पूर्ण करा

SBI ने ग्राहकांना संपाच्या तारखांपूर्वीच आवश्यक बँकिंग व्यवहार पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. संपाच्या काळात गरजेचा सेवा सुरू ठेवण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले जातील, असे बँकेने स्पष्ट केले आहे. मात्र, शाखांमधील सेवा प्रभावित होण्याची शक्यता लक्षात घेता ग्राहकांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नये.

SBI Customers Alert
RBI FD Rules : तुमचीही बँकेत FD आहे का? १ ऑक्टोबरपासून लागू होणार 'हा' नवीन नियम; बँक खात्यावर थेट परिणाम

ATM, YONO आणि UPIचा वापर करता येणार

रोख रकमेची गरज असल्यास ग्राहकांना ATM आणि ADWM मशीनचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच ग्राहक सेवा केंद्रांचाही वापर करता येईल.

डिजिटल व्यवहारांसाठी SBI Internet Banking, YONO, Mobile Banking आणि UPI यांसारख्या डिजिटल माध्यमांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे आणि इतर उपलब्ध डिजिटल बँकिंग सेवा वापरणे ग्राहकांना शक्य होईल.

दरम्यान, संपाचा प्रस्तावित कालावधी आणि त्याचा बँकिंग सेवांवर होणारा प्रत्यक्ष परिणाम संबंधित परिस्थितीनुसार बदलू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी SBI कडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com