

RBI New FD Rules: फिक्स्ड डिपॉझिट (FD) करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) FDच्या व्याजदरांबाबत पारदर्शकता आणि एकरुपता वाढवण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. हे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार असून, बँकांच्या शाखांमध्ये एकाच प्रकारच्या ठेवींवर वेगवेगळे व्याजदर देण्याची पद्धत बदलणार आहे.
नव्या नियमानुसार, एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये एकाच दिवशी समान रक्कम आणि समान कालावधीसाठी FD केली असेल तर त्यावर समान व्याजदर लागू करावा लागेल. म्हणजेच, फक्त शाखा किंवा ग्राहकांशी असलेल्या व्यवहाराच्या आधारावर वेगळा दर देण्याची शक्यता कमी होणार आहे.
याशिवाय, बँकांना त्यांच्या FD व्याजदरांची माहिती अधिकृत वेबसाइटवर आधीच उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना FD करण्यापूर्वी संबंधित व्याजदराची माहिती ऑनलाइन तपासता येईल.
१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी केलेल्या FD वर या बदलाचा थेट परिणाम होणार नाही. त्या FD ची मुदत पूर्ण होईपर्यंत करारानुसार ठरलेला व्याजदर लागू राहणार आहे. तसेच, या नियमांमुळे FD चे व्याजदर आपोआप वाढणार किंवा कमी होणार नाहीत. बँका बाजारातील परिस्थिती आणि निधीच्या खर्चानुसार दर निश्चित करतील.
RBI ने अनुसूचित कमर्शियल बँका आणि स्मॉल फायनान्स बँकांसाठी ३ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या ठेवींना बल्क डिपॉझिट म्हणून वर्गीकृत केले आहे. अशा ठेवींसाठी बँकांना दररोज सकाळी १० वाजेपर्यंत, १० मिनिटांच्या ग्रेस पीरियडसह म्हणजे १०:१० वाजेपर्यंत, वेबसाइटवर व्याजदर जाहीर करावे लागतील.
मात्र, बँकांना लिक्विडिटी रिस्क लक्षात घेऊन वेगवेगळ्या बल्क डिपॉझिटसाठी वेगवेगळे व्याजदर ठरवण्याची मुभा असेल. NRI रुपी डिपॉझिटवरही हे नियम लागू होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.