8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Fitment Factor Hike : आठव्या वेतन आयोगासमोर ३.२५ फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत आली आहे. अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. बेंगळुरूतील आगामी बैठकीकडे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.
8th Pay Commission Update
8th Pay Commission Update meta ai
Published On

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागलेल्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या कामकाजाला वेग आला आहे. आयोगाचा चंदीगड दौरा १८ सप्टेंबर रोजी पूर्ण झाला. या बैठकीत विविध कर्मचारी संघटना आणि संस्थांनी वेतन, भत्ते, पेन्शन तसेच फिटमेंट फॅक्टरबाबत आपल्या मागण्या मांडल्या. त्यात ३.२५ फिटमेंट फॅक्टरची मागणी विशेष चर्चेत आली.

चंदीगडमधील चर्चेदरम्यान PGIMER आणि Nurses Welfare Association शी संबंधित प्रतिनिधींनी नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सेवासुविधांबाबत विविध मागण्या मांडल्या. यामध्ये ३.२५ फिटमेंट फॅक्टर, नर्सिंग अधिकाऱ्यांसाठी Level-१० एंट्री पे, भत्त्यांमध्ये वाढ आणि पेन्शनशी संबंधित मागण्यांचा समावेश आहे. सध्या सातव्या वेतन आयोगात २.५७ फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता.

8th Pay Commission Update
LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

वाढती महागाई, घरभाडे, आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च तसेच नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरुप लक्षात घेऊन ३.२५ फिटमेंट फॅक्टरची मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे ३.२५ हा सध्या अधिकृत निर्णय नसून कर्मचारी प्रतिनिधींनी आयोगासमोर मांडलेली मागणी आहे. त्यामुळे या आधारावर पगार किती वाढेल, याचा अंतिम आकडा सध्या सांगता येत नाही. आयोगाच्या शिफारशी आणि त्यानंतरचा सरकारी निर्णय यावर प्रत्यक्ष वेतनवाढ अवलंबून असेल.

दरम्यान आठव्या केंद्रीय वेतन आयोगाचा पुढील महत्त्वाचा दौरा बेंगळुरू येथे ७ आणि ८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. आयोगाने यासाठी अधिकृत नोटीसही जारी केली आहे. या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचारी संघटना, संस्था आणि इतर संबंधित घटकांना आयोगासमोर आपले मुद्दे मांडण्याची संधी मिळणार आहे.

8th Pay Commission Update
BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

यामुळे आता बेंगळुरूतील बैठकीकडे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. फिटमेंट फॅक्टरसोबतच वेतनश्रेणी, भत्ते, पेन्शन आणि इतर सेवा-सुविधांबाबत कोणत्या मागण्या पुढे येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com