Maharashtra Government: प्रति शेळी, मेंढीसाठी ४ तर दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार रुपये; पूरग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकारकडून नव्याने मदतीची घोषणा

Flood-Affected Farmers Additional Compensation : महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी नव्या मदतीची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि अतिरिक्त मदत मिळणार आहे.
Flood-Affected Farmers  Additional Compensation :
Flood-hit farmers in Maharashtra to receive fresh financial relief as government announces new support measures.saam tv
Published On
Summary
  • पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी मदत घोषणा

  • 2 लाखांपर्यंत पीक कर्जमाफीचा लाभ

  • 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्जधारकांना फायदा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशात शेतकर्‍यांना दोन लाखांपर्यंत पीक कर्जमाफीची घोषणा केली. 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता परत फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना गिफ्ट दिले आहे.

Flood-Affected Farmers  Additional Compensation :
3 महिन्यानंतर कदाचित LPG बंद होईल; मंत्री छगन भुजबळांचं दिल्लीतून मोठं वक्तव्य

गेल्यावर्षाच्या जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याला महापूर, अतिवृष्टीचा फटका बसला होता. त्यात जवळपास 20 हून अधिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत तुटपूंजी असल्याची ओरड होत होती. तर या शेतकर्‍यांना कर्जमाफीची मदत मिळाली नसल्याची चर्चा होती. आता फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची ही नाराजी दूर केली आहे.

Flood-Affected Farmers  Additional Compensation :
तळीरामांची मज्जाच मज्जा; आता पेट्रोल पंपवरही मिळणार दारू, सरकारचा मोठा निर्णय

नवीन नियमामुळे शेतकऱ्यांना थेट मदत मिळणार

राज्य सरकारने जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी नव्याने मदतीची घोषणा केली आहे. फडणवीस सरकारकडून शेतकर्‍यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल करण्यात आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास त्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट शिथिल करण्यात आली आहे.

पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी मदत मिळणार

सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा

मृत झालेल्या जनावरांसाठी व गोठ्याच्या नुकसानीसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

अल्प, अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व अपघातग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र असणार आहेत.

प्रत्येक पशुपालकांना कमाल ३ मोठ्या दुधाळ व ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.

प्रत्येक पशुपालकांना कमाल ६ ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र असतील.

प्रत्येक पशुपालकांना कमाल ३० लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरांसाठी आर्थिक मदत दिली जाईल.

प्रत्येक पशुपालकांना कमाल १०० कुक्कुट पक्षांसाठी १० हजार रूपयांच्या मर्यादेऐवजी मृत व बेपत्ता असलेले सर्व कुक्कुटपक्षी मदतीसाठी पात्र असणार आहेत.

पडझड व नष्ट झालेल्या गोठ्यांसाठी ३ हजार रुपये दिले जातील.

मृत दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर ३७ हजार ५०० रुपये मदत केली जाईल.

ओढकाम करणार्‍या जनावरांच्या मृत्यूसाठी ३२ हजार रुपये मिळतील.

मृत पावलेल्या लहान जनावरांसाठी २० हजार रुपयांची मदत जाहीर

प्रति शेळी व मेंढीसाठी ४ हजार रुपयांची मदत जाहीर

कुक्कुटपालन करणाऱ्यांना प्रति कोंबडी १०० रुपये देणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com