Jammu-Kashmir Blast Saam Tv
देश विदेश

Jammu-Kashmir Blast: दिल्लीनंतर जम्मू-काश्मीर हादरले, पोलिस ठाण्यात भयंकर स्फोट; २ पोलिस अधिकाऱ्यांसह ९ जणांचा मृत्यू

Srinagar Blast: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये भयंकर स्फोट झाल्याची घटना घडली. नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोट झाल झाला. या स्फोटामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. तर ३० जण गंभीर जखमी झाले. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला.

Priya More

Summary -

  • श्रीनगरच्या नौगाम पोलिस स्टेशनमध्ये मध्यरात्री जोरदार स्फोट झाला

  • २ पोलिस अधिकाऱ्यांसह ९ जणांचा मृत्यू आणि ३० जण गंभीर जखमी

  • पोलिस स्टेशनची इमारत कोसळली; अनेक वाहने पेटली

  • ढिगाऱ्याखाली अजून लोक अडकले असण्याची भीती, बचावकार्य सुरू

दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटाची घटना ताजी असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये देखील स्फोटाची भयंकर घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री दक्षिण श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये स्फोटाची ही घटना घडली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. पोलिस ठाण्यामध्ये उपस्थित असलेल्या २ पोलिस अधिकाऱ्यांसह ९ जणांचा या स्फोटामध्ये मृत्यू झाला. तर ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नौगाम पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला आणि त्याचे पडसाद अनेक किलोमीटरपर्यंत उमटले. स्फोटामुळे आसपासच्या परिसरातील नागरिक घाबरले. स्फोटानंतर पोलिस स्टेशनच्या इमारतीचा मोठा भाग कोसळला तसंच अनेक वाहनांनी पेट घेतला. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये मृतांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री ११:२२ वाजता झालेल्या या स्फोटात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आणि ३० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या भंयकर स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की स्फोट इतका भयंकर होता की आगीचे आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले. स्फोटानंतर पोलिस स्टेशनच्या आतमध्ये छोटे छोटे स्फोट होत होते त्यामुळे बचाव पथकाला आतमध्ये जाण्यासाठी एक तास लागला. या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत बिघाडी; राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार

पोलीस ठाण्यात स्फोट नेमका कसा झाला? फरिदाबाद कनेक्शन उघड, डीजीपींकडून मोठा खुलासा

Gold -Silver Price: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळे १९,६०० रुपयांनी स्वस्त; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra Live News Update: मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या रिंगणात

Bad Driving Habits : कार ड्रायव्हिंग करत असताना या चुका करु नये, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT