Fraud Case : प्रसिद्ध अभिनेत्रीची ४७ लाखांची फसवणूक, थेट पोलिसांत घेतली धाव, नेमकं प्रकरण काय?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्येष्ठ अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना मोठा धक्का बसला आहे.

Marathi Actor | GOOGLE

फसवणूक

मिडिया रिपोर्टनुसार, वर्षा उसगांवकर यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Fraud Scam | GOOGLE

लाखो रुपयांची फसवणूक

अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि मृणालिनी जांभळे यांच्यासह इतर अभिनेत्रींची एकूण जवळपास 47लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

Mrunalini Jambhale | GOOGLE

तक्रार नोंदवली

या प्रकरणी अविनाश जाधव याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Varsha Usgaonkar | GOOGLE

व्यावसायिक ओळख

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार मृणालिनी जांभळे यांची आरोपीशी व्यावसायिक ओळख होती.त्याने स्वतःला चित्रपट निर्माता आणि बिल्डर असल्याचे सांगितले होते.

Varsha Usgaonkar | GOOGLE

आश्वासन

डोंबिवलीतील प्रकल्पात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आश्वासन जाधवने दिले होते. वर्षभरात मूळ रक्कम परत देईन असेही सांगितले होते.

Cash | GOOGLE

ऑनलाइन व्यवहार

नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान चेक आणि ऑनलाइन व्यवहारातून 47 लाखांची गुंतवणूक करण्यात आली.

Online Payment | GOOGLE

लाख रुपये

सुरुवातीला जाधवने सुमारे साडेचार लाख रुपये परत केले. मात्र त्यानंतर त्याने परतावा देणे पूर्णपणे बंद केले.

Cash | GOOGLE

मोबाईल नंबर आणि पत्ता बदलला

पैसे मागितल्यावर आरोपीने मोबाईल नंबर आणि पत्ता बदलत राहिल्याचा आरोप आहे. नंतर “मी पैसे देणार नाही” असे उलट उत्तर दिल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

Mobile Number | GOOGLE

प्रकरणाचा तपास सुरू

26 फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

Police Case | GOOGLE

Genelia Deshmukh: 'पिंक स्वॅग...'; जिनिलीया देशमुखचा ग्लॅमरस पिंक बार्बी लूक व्हायरल

Genelia Deshmukh
येथे क्लिक करा