Crime News: पुणे, बीडनंतर आता लातूरमध्ये गुंडाराज;भरचौकात तरुणावर तलवारीनं हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Youth Attack In Latur: दोन दिवसांपूर्वीच एका तरुणावर दोन ते तीन जणांनी कोयत्याने हल्ला केला होता. आता पुन्हा एका तरुणावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडलीय.
Youth Attack In Latur
CCTV grabs show youth attacked with a sword in Latur city; police begin investigation.saam tv
Published On
Summary
  • नाईक चौक परिसरात एका तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला

  • हल्लेखोरांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • लातूर शहरात कोयता आणि तलवारीच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

लातूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागलीय. अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात बाप लेकाची हत्येची घटनेनंतर आता शहरात तरुणावर हल्ला झाल्याची घटना घडलीय. गुंड तलवार आणि कोयते दाखवून शहरात दहशत माजवत आहेत. शहरात कोयता आणि तलवारीच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने होताना दिसत आहेत.

Youth Attack In Latur
Shocking: धक्कादायक! मित्रच बनला वैरी; २५ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या, नेमकं घडलं काय?

दोन दिवसांपूर्वीच एका तरुणावर दोन ते तीन तरुणांनी कोयताने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज लातूर शहरातल्या नाईक चौक परिसरात रात्री तीन ते चार जणांनी एका तरुणावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Youth Attack In Latur
लातूर हादरलं! मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

दरम्यान या हल्ला करणाऱ्या व्यक्तींविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तरुणावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झालेत. सातत्याने होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे शहरात भीतीचे आणि दहशतीच वातावरण आहे. या सगळ्या घटनांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

बाप-लेकाचा खून

अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात बाप-लेकाची हत्या झाल्याची घटना एक दिवसापूर्वी घडली होती. शिवराज सुरनर (७०) आणि विश्वनाथ शिवराज सुरनर अशी बाप-लेकाची नावे आहेत. शिवराज सुरनर (७०) आणि विश्वनाथ शिवराज सुरनर हे ३ तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास शेतातील आखाड्यावर झोपायला गेले होते.ते गाढ झोपेत असताना त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केला. त्यात दोघांचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com