Delhi Terror Blast: ३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट, बॉम्ब स्फोटांचा खरा सूत्रधार कोण? हँडलरचे नाव आलं समोर

Delhi Terror Blast: फरिदाबाद येथील दहशतवादी मॉड्यूल आणि दिल्ली कार बॉम्बस्फोटांमध्ये हँडलर उकासाचे नाव समोर आले आहे. मुजम्मिल गनईच्या चौकशीदरम्यान तुर्की कनेक्शन समोर आले आहे.
Delhi Terror Blast
Delhi terror blast investigation uncovers 32-car bomb plot; handler Abu Ukasa linked to Turkey revealed as mastermind.saam tv
Published On
Summary
  • . उकासा हा मोहम्मद उमर आणि मुजम्मिल शकीलचा हँडलर होता.

  • अबू उकासा हा जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आणि मसूद अझहरचा जवळचा नातेवाईक

  • दिल्लीसह अनेक ठिकाणी साखळी हल्ले करण्याच्या कट होता.

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आणि जैश-ए-मोहम्मदच्या फरिदाबाद-सहारापूर मॉड्यूलच्या तपासात महत्त्वाचे खुलासे झालेत. दिल्ली बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड म्हणून अबू उकासा (कोड नेम) याचे नाव समोर आलंय.

स्फोटात वापरण्यात आलेल्या ह्युंदाई आय२० कारचा चालक मोहम्मद उमर हा तुर्कीमधील अंकारातील उकासाच्या संपर्कात होता. उकासा हा मोहम्मद उमर आणि मुजम्मिल शकीलचा हँडलर असल्याचे सांगितले जात आहे. तर हे दहशतवादी ३२कारच्या सहाय्याने अनेक ठिकाणी स्फोट घडवण्याच्या तयारीत होते.

सुरक्षा यंत्रणेला संशय येऊ नये म्हणून डॉक्टर मुजम्मिलने वर्ष २०२२ मध्ये हॅण्डलरला भेटण्यासाठी तुर्की देश निवडला होता. मुजम्मिल आणि उमर यांचे ब्रेनवॉश येथेच करण्यात आले होते. अबू उकासा हा जैश-ए-मोहम्मदचा कमांडर आणि मसूद अझहरचा जवळचा नातेवाईक आहे. सुरुवातीला या हँडलरने व्हॉट्सअॅपवरून मुजम्मिलनशी संपर्क करत असायचा. पण नंतर दोघेही सेशन अॅपद्वारे बोलू लागले, जेणेकरून त्यांचे संभाषण लीक होऊ नये आणि एजन्सींना त्याची माहिती मिळू नये.

Delhi Terror Blast
Delhi Blast: जम्मू काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई; संशयित आरोपी मुजम्मिलच्या बहिणीला अटक, दिल्ली स्फोटाचं बांगलादेश कनेक्शन

मसूद अझहरच्या ग्रुपच्या संपर्कात

दिल्लीत स्फोट घडवणाऱ्या डॉक्टरांचा हा हायब्रिड दहशतवादी मॉड्यूल उमर बिन खिताब आणि फरजान दारुल उलूम या दोन टेलिग्राम गटांशी जोडलेला होता. हे ग्रुप जैश-ए-मोहम्मदचे होते कारण या ग्रुपमध्ये जैश आणि मौलाना मसूद अझहर यांचे जुने विधानं, पत्रे आणि जिहादला भडकावणारी दहशतवाद समर्थक पोस्ट यात व्हायरल करण्यात येत होते, असा संशय गुप्तचर विभागाला आहे.

Delhi Terror Blast
Delhi Blast: ८ दहशतवादी, ४ शहरं आणि ४ कार... फक्त दिल्लीच नव्हे तर देशाला हादरवण्याचा होता प्लान; तपासातून धक्कादायक खुलासा

३२ कार बॉम्बने दिल्ली उडवण्याचा कट

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा झाला. पोलीस सूत्रांच्या मते दहशतवादी ६ डिसेंबर म्हणजे बाबरी मशीद पाडण्यात आलेल्या दिवसाच्या वर्धापनदिनी, दिल्लीसह अनेक ठिकाणी साखळी हल्ले करण्याच्या कट होता.

या हल्ल्यांसाठी त्यांनी ३२ गाड्यांची व्यवस्था केली होती. या सर्व गाड्यांमध्ये बॉम्ब आणि स्फोटक साहित्य भरून वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवणार होते. या गाड्यांमध्ये ब्रेजा, स्विफ्ट डिजायर, इकोस्पोर्ट आणि आय20 अशा अनेक मॉडेल्सचा समावेश होता. दरम्यान आतापर्यंत तपास संस्थांना चार गाड्या सापडल्या आहेत.

Delhi Terror Blast
Blast: भयंकर स्फोटाने उत्तर प्रदेश हादरले, दोघांचा मृत्यू; भीषण आग अन् धुराचे लोट

दिल्ली स्फोट प्रकरणी तुर्कीनं दिलं स्पष्टीकरण

दरम्यान फरीदाबाद टेरर मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुजम्मिलन गनई याची चौकशीत तुर्कीचा उल्लेख झाला होता. दरम्यान तुर्कीने हे वृत्त फेटाळालंय. या घटनेत भारतासह इतर दुसरे दहशतवादी कारवायांचा समावेश असल्याचा आरोप तुर्कीनं लावला होता. तुर्कीच्या संचार मंत्रालयानं दहशतवादी संघटनांना आर्थिक, लॉजिस्टिक आणि राजनैतिक पाठिंबा देण्याचे सर्व दावे खोटे असल्याचं सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com