बिहारच्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी आयपीएस पदाचा राजीनामा दिला आहे. २२ व्या वर्षी त्या आयपीएस अधिकारी झाल्या होत्या. ६ वर्षांची सर्व्हिस केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.
काम्या मिश्रा या २०१९ बॅचच्या आयपीएस अधिकारी होत्या. त्यांनी ६ ऑगस्ट २०२४ रोजी काही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यावर अनेक दिवस कोणताही निर्णय झाला नव्हता.
काम्या यांच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय न झाल्याने त्या २७ ऑगस्ट २०२४ पासून रजेवर होत्या. त्या १८० दिवसांच्या रजेवर होत्या. रजा संपल्यानंतर त्या पुन्हा कामावर रुजू झाल्या नाही. अखेर त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. काम्या यांनी राजीनामा दिला तेव्हा त्या दरभंगा येथे एसपी पदावर कार्यरत होत्या.
काम्या मिश्रा यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. त्यांनी नागरिकांसाठी, महिला सशक्तीकरणासाठी कामे केली. त्यांना बिहारमध्ये लेडी सिंघमदेखील म्हणतात. काम्या या मूळच्या ओडिशाच्या रहिवासी आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली आणि त्या आयपीएस अधिकारी झाल्या.
काम्या यांचा राजीनामा अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. अखेर तो मान्य झाला आहे. काम्या यांचे पती अवधेश सरोज हेदेखील आयपीएस अधिकारी आहेत. काम्या यांच्या अचानक राजीनामा देण्याने त्या चर्चेत आल्या आहेत.
काम्या यांनी २०१९ मध्ये यूपीएससी (UPSC) परीक्षा पास केली. यामध्ये त्यांना १७२ रँक मिळवली. त्यांचे पहिली पोस्टिंग हिमाचल प्रदेशमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांनी बिहार कॅडरमध्ये ट्रान्सफर करुन घेतली. त्यांनी त्यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात अनेक चांगली कामे केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.