Success Story: तिखट मिरची झाली गोड, शेतकऱ्याला एका एकरात मिळाला अडीच लाखांचा नफा

Inspirational Story Of Nanded Farmer: नांदेडच्या एका शेतकऱ्याने १ एकर शेतीतून तब्बल अडीच लाखांचे उत्पन्न घेतलं आहे. त्यांनी यासाठी फक्त ५५ हजार रुपये खर्च केला होता.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

संजय सुर्यवंशी, साम टीव्ही प्रतिनिधी

शेतकरी हा आपल्या शेतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतो. शेतीत अनेकदा प्रयोग केल्यावर शेतकऱ्यांना तोटा झाला आहे. परंतु नांदेडच्या एका शेतकऱ्याने १ एकर शेतीतून अडीच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. मिरचीच्या पिकातून त्यांनी हा नफा मिळवला आहे.

पारंपरिक शेती सोबतच अनेक शेतकरी हे भाजी-पाला शेतीकडे वळले आहेत. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोन या गावाच्या एका तरुण शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेती पैकी एका एकर शेतीमध्ये हिरव्या मिरचीची लागवड केलीय. देवाजी भिसे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. भिसे हे मागील तीन वर्षांपासून आपल्या शेतीत मिरचीचे उत्पादन घेत आहेत.

Success Story
Success Story: शिक्षण अर्धवट सोडलं, कित्येक रात्री रेल्वे स्टेशनवर काढल्या, आज उभारली ९२००० कोटी रुपयांची कंपनी

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका तसा बागायतदार तालुका म्हणून ओळखला जातो. केळी हे पीक या तालुक्यातील मुख्य पीक आहे. परंतु केळीवर वेळोवेळी येणारं अस्मानी संकट त्यामुळे या तालुक्यातील अनेक शेतकरी आता नगदी पिकाकडे वळले आहेत. भाजी-पाला हे नगदी पीक असल्याने अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा भर सध्या भाजी-पाला लागवडी कडे वळल्याचे दिसत आहे.

अर्धापूर तालुक्यातील लोन या गावाच्या तरुण शेतकऱ्याने भाजी-पाला शेतीतून आपली आणि आपल्या परिवाराची आर्थिक उन्नती केली आहे. भिसे यांच्या एकूण पाच एकर शेती पैकी एका एकर मध्ये हिरवी मिरची आहे.सध्या ही मिरची तोडणीला आलीय.एका एकर मध्ये मिरची लागवडीसाठी भिसे यांना केवळ 55 हजार रुपये खर्च आला.

Success Story
Success Story: ब्युटी विथ ब्रेन! दोनवेळा UPSC मध्ये अपयश, १०० वेळा रिव्हीजन; तिसऱ्या प्रयत्नात IAS होणाऱ्या मीनल करनवाल आहेत तरी कोण?

55 हजार रुपये खर्च वगळता अडीच लाखांचे उत्पन्न भिसे यांना मिळाले आहे. मिरची तोडणी सुरु असून अजून या मिर्चीतून उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या शेतकऱ्याला आहे.भिसे यांच्या या हिरव्या आणि तिखट मिरचीने त्यांच्या संसारात गोडवा निर्माण केला आहे.

Success Story
Success Story: एमबीए केलं, बँकेत ऑफिसर म्हणून काम, फुल टाइम नोकरी करत UPSC क्रॅक; IAS स्तुति चरण आहेत तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com