Shreya Maskar
फणसाच्या गऱ्यांची भाजी बनण्यासाठी अर्धवट पिकलेला फणस, ओले खोबरे, मिरची, मोहरी, लाल तिखट, हळद आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
फणसाच्या गऱ्यांची भाजी बनण्यासाठी सर्वप्रथम अर्धा पिकलेला कापा फणस फोडून गरे काढून घ्या.
फणसाचे गरे मधून कापून त्याचे दोन तुकडे करा.
फणसातील आठळ्या काढून पाण्यात भिजत ठेवा.
आठळ्यांचे दोन तुकडे करून छान उकडून घ्या.
आता एका पॅनमध्ये खोबरेल तेल घालून त्यात मोहरी, मिरची आणि लाल तिखट परतून घ्या.
या मिश्रणात फणसाचे काप, फणसातील आठळ्या , हळद, मीठ आणि पाणी टाकून वाफवून घ्या.
शेवटी ओले खोबरे आणि कोथिंबीर टाका.