Shreya Maskar
जेवताना तोंडी लावायला शेवग्याच्या पानांची चटणी बनवा.
शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी तेल, चणा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, धणे, जिरे , लाल सुक्या मिरची, आळशी, शेवग्याच्या शेंगा, कढीपत्ता, चिंच आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चणा डाळ , उडीद डाळ , शेंगदाणे, धणे, जिरे, लाल सुक्या मिरच्या, आळशी घालून सगळे पदार्थ एकत्र तेलात परतून घ्या.
आता दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात शेवग्याची पाने चांगली परतून घ्यावी.
मिक्सरच्या भांड्यात भाजलेला मसाला आणि शेवग्याची पाने, चिंच वाटून घ्या.
या मिश्रणाला कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी द्या.
तयार चटणी ५-६ दिवस हवाबंद डब्यात ठेवू शकता.
भाकरी आणि चपातीसोबत चटपटीत शेवग्याच्या पानांची चटणीचा आस्वाद घ्या.
शेवग्याच्या पानांची चटणीमुळे हाडे देखील मजबूत होतात.